Cyclone Fengal Agrowon
हवामान

Cyclone Fengal : फेंगल चक्रीवादळाचा तडाखा; किनारी भागात सुसाट्याचा वारा, जोरदार पावसालाही सुरुवात

Fengal Cyclone Update : फेंगल चक्रीवादळ आज सायंकाळपर्यंत तमिळनाडू आणि पुद्दुचेरीदरम्यान कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे.

अनिल जाधव

Pune News : फेंगल चक्रीवादळ आज सायंकाळपर्यंत तमिळनाडू आणि पुद्दुचेरीदरम्यान कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. आज सकाळपासून किनारी भागात वेगाचे वारे वाहत असून जोरदार पावसालाही सुरुवात झाली आहे. किनारी भागात आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून विमानांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला.

फेंगल चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे. सध्या हे चक्रीवादळ नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात घोंगावत आहे. फेंगल चक्रीवादळ १२ किलोमीटर प्रतितास वेगाने किनाऱ्याकडे वाटचाल करत आहे. चक्रीवादळ सध्या पुद्दुचेरीपासून पूर्वेला १५० किलोमीटर तर चेन्नईपासून अग्नेयला १४० किलोमीटर अंतरावर आहे.

फेंगल पश्चिमेकडे वाटचाल करत असून आज संध्याकाळपर्यंत उत्तर तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीला कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. यावेळी ७० ते ८० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

फेंगल चक्रीवादळामुळे तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशात पावसाचा अंदाज आहे. आज उत्तर तमिळनाडू आणि रायलसिमा भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यानुसार आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली.

तसेच उद्या तमिळनाडूच्या अंतर्गत भागात आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. २ आणि ३ डिसेंबरला तमिळनाडू आणि रायलसिमा भागात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

दरम्यान, चेन्रई आणि पुद्दुचेरी भागात समुद्रात उंट लाटा उसळत आहेत. किनारी भागात जोरदार पावसालाही सुरुवात झाली. चेन्नई येथील हवामान खात्याने किनारी भागात सुसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज दिला.

तमिळनाडू आणि पुद्दुचेरीजवळ कराईकल आणि महाबलीपूरम किनारपट्टीच्या लगत जिल्ह्यांना चक्रीवादळाचा तडाखा बसेल. आज सकाळपासून किनाऱ्या भागात वाऱ्यांचा वेग वाढला. चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकेल तेव्हा प्रतितास ७० ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे चेन्नई प्रादेशिक हवामान विभागाने म्हटले आहे.

प्रशासन सज्ज

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभुमीवर उपाययोजना आणि प्रशासनाची तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठकही घेतली. तिरुवरूर, मायिलादुथुराई, नागापट्टिनम, कुड्डालोर, कामेश्वरम, विरूंधमावडी, पुडूपल्ली, वेद्राप्पु, वनमादेवी, वल्लापल्लम, कल्लिमेडू, इरावायल आणि चेम्बोडी या भागाला चक्रीवादळाचा फटका बसू शकतो.

याभागात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तकड्या तैनात केल्या आहेत. तसेच विमानाच्या वेळापत्राकातही बदल करण्यात आला. या भागातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT