Biporjoy Cyclone Agrowon
हवामान

Biporjoy Cyclone : ‘बिपॉरजॉय’ झेपावतंय गुजरातकडे

Cyclone Biporjoy Update : अरबी समुद्रातील ‘बिपॉरजॉय’ तीव्र चक्रीवादळाची दिशा बदलल्यानंतर हे वादळ गुजरातच्या किनाऱ्याकडे झेपावत आहे.

Team Agrowon

Pune News : अरबी समुद्रातील ‘बिपॉरजॉय’ तीव्र चक्रीवादळाची दिशा बदलल्यानंतर हे वादळ गुजरातच्या किनाऱ्याकडे झेपावत आहे. गुरुवारी (ता. १५) सायंकाळपर्यंत ताशी १२५ ते १५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह गुजरात आणि पाकिस्तानच्या किनाऱ्यादरम्यान जमिनीवर येण्याची शक्यता आहे. या वादळामुळे गुजरातला जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

मंगळवारी (ता. १३) ही प्रणाली गुजरातच्या द्वारकेपासून २८० किलोमीटर नैॡत्येकडे, पोरबंदरपासून ३०० किलोमीटर पश्‍चिमेकडे, तर नालियापासून ३३० किलोमीटर आणि पाकिस्तानच्या कराचीपासून ४५० किलोमीटर दक्षिणेकडे होती.

हे वादळी आज ईशान्य दिशेकडे वळून गुरुवारी (ता. १५) सायंकाळपर्यंत गुजरातच्या मांडवी आणि पाकिस्तानच्या कराची दरम्यान असलेल्या गुजरातच्या जखाऊ बेटांजवळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे.

वादळामुळे अरबी समुद्र खवळला असून, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यावर उंच लाटा उसळत आहेत. समुद्राला भरती आल्याने पाण्याची पातळी वाढली असून, किनारपट्टीवर ५० ते ६० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहत आहेत.

या चक्रीवादळामुळे ईशान्य अरबी समुद्रात ताशी १५० ते १८० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. आजपासून (ता. १४) कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागड आणि सौराष्ट्राच्या मोरबी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा आहे.

वादळामुळे किनाऱ्यावर २ ते ६ मीटर उंचीच्या लाटा उसळणार असून, सखल भागांत पाणी भरण्याबरोबरच पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. जोरदार वाऱ्यामुळे कच्ची- पक्की घरे, विजांचे खांब, नारळ, आंब्यासारखी झाडे पडण्याची शक्यता आहे. रेल्वे, दूरसंचार, दळणवळणाच्या सुविधादेखील वादळामुळे प्रभावित होऊन जनजीवन विस्कळीत होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT