Biporjoy Cyclone Gujrat Update Agrowon
हवामान

Biporjoy Cyclone : बिपरजाॅय चक्रीवादळाचे गुजरातमध्ये थैमान

Biporjoy Cyclone Gujrat Update : गुजरातच्या किनारपट्टीभागात बिपरजाॅय चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसत आहे. सौराष्ट्र आणि कच्छ भागात चक्रीवादळाचे थैमान पाहायला मिळत आहे.

Team Agrowon

Cyclone Update : गुजरातच्या किनारपट्टीभागात बिपरजाॅय चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसत आहे. सौराष्ट्र आणि कच्छ भागात चक्रीवादळाचे थैमान पाहायला मिळत आहे. या भागात ११५ ते १२० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि झाडे उन्मळून पडली. तर घरांचे नुकसानही झाले. तसेच दोन जणांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे.

चक्रीवादळामुळे राज्य आणि केंद्र सरकारने आधीच उपाययोजना सुरु केल्या होत्या. गुजरातमधील आठ जिल्ह्यातील एक लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. तर जनावरांना सुरक्षित जागेवर नेण्यात आले होते.

काल सायंकाळी चक्रीवादळाने गुजरात किनारपट्टीला धडक दिली. सौराष्ट्र आणि कच्छ भागात याचा प्रभाव जास्त जाणवत आहे. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे वादळाचे रौद्ररुप पाहायला मिळाले.

बिपरजाॅय चक्रीवादळामुळे किनारी भागाला चांगलाच तडाखा बसत आहे. ईशान्य अरबी समुद्रात घोंगावणारे हे चक्रीवादळ ईशान्येकडे सरकत आहे. बिपरजाॅय चक्रीवादळाने सौराष्ट्र आणि कच्छ भाग ओलांडला.

सध्या हे चक्रीवादळ गुजरातमधील मंडावी आणि पाकिस्तानमधील कराचीच्यामध्ये गुजरातमधील जखाऊ बंदराजवळ आहे. हे अतितीव्र चक्रीवादळ आता काहीसे कमजोर झाले आहे. सौराष्ट्र आणि कच्छ भागात चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली.

भावनगर जिल्ह्यात नाल्यामध्ये बकऱ्या वाहून जात होत्या. या बकऱ्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या वडिल आणि मुलाचा मृत्यू झाला. शेकडो झाडे उन्मळून पडली, खंडे आडले झाले, टाॅवर्सचे नुकसान झाले. काही भागात धूळ वादळी तयार झाले. यामुळे जनजिवन विस्कळीत झाले होते.

तर शेकडो गावांचा विजपुरवठा खंडीत झाला. चक्रीवादळामुळे आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, अंदमान आणि निकोबारमध्ये अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी पाऊस सुरुही झाला.

बिपरजाॅय चक्रीवादळामुळे पाकिस्तानच्या किनारी भागालाही तडाखा बसला. पाकिस्तानमध्ये १४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. पाकिस्तानी सरकारने किनारी भागातील ७२ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

चक्रीवादळ सातत्याने ईशान्येकडे सरकत आहे. चक्रीवादळ जखाऊ बंदरापासून ७० किलोमीटर पूर्व ईशान्येकडे आणि नालियापासून ५० किलोमीटर ईशान्येकडे येण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ सातत्याने ईशान्येकडे सरकण्याची शक्यता असून त्याची तीव्रताही कमी होत जाईल, अशी शक्यता आहे.

दुपारपर्यत हे चक्रीवादळ सौराष्ट्र आणि कच्छ भागात कुमकुवत होत जाईल आणि सायंकाळच्या दरम्यान याचे रुपांतर कमी दाब क्षेत्रात होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT