Crop Damage Agrowon
हवामान

Unseasonal Rain : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत वादळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ

गुरुवारी (ता. १३) दिवसभर उकाडा जाणवत होता. रात्री साडेनऊच्या सुमारास वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस झाला. मध्यरात्रीनंतर अनेक भागांत जोरदार पाऊस झाला.

Team Agrowon

Parbhani News : परभणी- हिंगोली जिल्ह्यांतील अनेक मंडलांत शुक्रवारी (ता. १४) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह हलका ते जोरदार पाऊस (Unseasonal Rain) झाला.

हळद, कापूस, ज्वारी, गहू आदींसह फळे, भाजीपाला (Vegetable) पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले. काढणी केलेला शेतमाल झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

गुरुवारी (ता. १३) दिवसभर उकाडा जाणवत होता. रात्री साडेनऊच्या सुमारास वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस झाला. मध्यरात्रीनंतर अनेक भागांत जोरदार पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या तालुक्यांतील २० मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला.

परभणी, सोनपेठ, गंगाखेड तालुक्यांतील अनेक मंडलांत पावसाचा जोर अधिक होता. जिल्ह्यात सरासरी १.८ मिमी पाऊस झाला. एप्रिल महिन्यात सरासरी ४.७ मिमी पाऊस झाला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागाच्या वेधशाळेत ४.५ मिमी पावसाची नोंद झाली.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ तालुक्यांतील अनेक मंडलांत वादळी वारे, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस झाला. या दोन जिल्ह्यांतील हळद काढणी सुरू आहे. रात्री अचानक आलेल्या पावसामुळे हळद भिजली आहे.

वादळामुळे आंब्यांची फळगळ झाली. उशिरा पेरणी केलेली ज्वारी, गहू या पिकांसह वेचणीस आलेल्या कापूस, फळे, भाजीपाल्याचे नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Empowerment: ‘ॲग्रोवन’ वर्धापन दिनानिमित्त कष्टकरी महिलांचा सन्मान

Farmers Protest: गोंडपिपरीत एमआयडीसी विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

Shaktipeeth Highway Project: ‘शक्तिपीठ’साठी जबरदस्ती मोजणी केल्यास जशास तसे उत्तर देऊ

Mini Tractor Scheme: मिनी ट्रॅक्टर योजनेमुळे महिला बचत गटांची भरारी

Cotton Procurement: परभणी, हिंगोलीत २१.५३ लाख क्विंटलवर कापूस खरेदी

SCROLL FOR NEXT