Monsson Rain Agrowon
हवामान

El Nino : देशात या वर्षी बरसणार धो-धो पाऊस

Monsoon Rain : तहानलेल्या शहरांसाठी आणि पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हवामान खात्याने रविवारी (ता.११) दिली आहे.

Team Agrowon

Latest Monsoon Rain Update : तहानलेल्या शहरांसाठी आणि पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हवामान खात्याने रविवारी (ता.११) दिली आहे. प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचा प्रवाह असलेल्या ‘एल निनो’चा प्रभाव कमी होणार असल्याने देशातील नैॡत्य मोसमी पाऊस चांगला पडेल, अशी अपेक्षा वेगवेगळ्या हवामान संस्थांनी व्यक्त केली आहे.

देशात मागील वर्ष, म्हणजे २०२३ हे सर्वांत उष्ण ठरले. त्या वर्षी ‘एल निनो’ सक्रिय होता. त्याचा थेट परिणाम मॉन्सूनवर झाल्याचे दिसून आले. गेल्या वर्षी बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला.

त्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. येत्या जून ते ऑगस्ट दरम्यान प्रशांत महासागरातील थंड पाण्याच्या प्रवाह ‘ला निना’ची स्थिती येईल. त्याचा परिणाम होऊन यंदा देशात मॉन्सून चांगला राहील, असेही सांगण्यात आले आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे : एप्रिल-जूनपर्यंत ‘एल निनो’ सामान्य असण्याची शक्यता ७९ टक्के आहे आणि जून-ऑगस्टमध्ये ‘ला निना’ विकसित होण्याची शक्यता ५५ टक्के आहे, अशी माहिती ‘युनायटेड स्टेट्सच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन’ने (एनओएए) गेल्या आठवड्यात दिली.

युरोपियन युनियनच्या ‘कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस’नेदेखील ‘एल निनो’चा प्रभाव कमी होत आहे, याला पुष्टी दिली आहे. भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ डॉ. डी. शिवानंद पै म्हणाले, ‘‘सध्याच्या हवामान स्थितीबाबत निश्चित भाष्य करता येत नाही. कारण, काही हवामान प्रारूपे ‘ला निना’चा अंदाज देत आहेत, तर काही ‘एल निनो’ सामान्य राहील, असेही सांगत आहेत.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT