Cold Weather Agrowon
हवामान

Cold Weather Update : उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी महाराष्ट्र गारठला

Winter Update : उत्तर भारतातील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पसरली आहे. पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्लीच्या अनेक भागात किमान तापमान ४ ते ८ अंशांच्या दरम्यान आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तर भारतातील थंडीचे लोण हळूहळू महाराष्ट्रात पसरत आहे. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा प्रथमच यंदाच्या हंगामातील नीचांकी पातळीवर आल्याने महाराष्ट्र गारठला आहे. शनिवारी (ता. १६) नगर जिल्ह्यातील जेऊर येथे राज्याच्या हंगामातील नीचांकी १०.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

उत्तर भारतातील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पसरली आहे. पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्लीच्या अनेक भागात किमान तापमान ४ ते ८ अंशांच्या दरम्यान आहे. तर पंजाबमधील अमृतसर आणि लुधियाना येथे देशातील नीचांकी ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यातच राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडीचे आगमन झाले आहे.

राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा १३ अंशांच्या खाली घसरला आहे. गारठा वाढू लागल्याने जेऊर पाठोपाठ परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ११ अंश सेल्सिअस, यवतमाळ येथे ११.५ अंश, तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ११.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

शनिवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे २८.४ (१२.०), जळगाव २८.४ (१३.३), कोल्हापूर २७.९ (१७.२), महाबळेश्वर २४.६ (१३.३), नाशिक २७.१ (१२.५), निफाड २९.२ (११.६), सांगली २७.९ (१५.८), सातारा २८.७ (१३.५), सोलापूर ३०.३(१६.६), सांताक्रूझ ३३.३ (१९.४), डहाणू ३३.९ (१९.३), रत्नागिरी ३३.० (२०.१),

छत्रपती संभाजीनगर २७.० (१३.४), नांदेड - (१४.२), परभणी २४.७ (१३.६), अकोला २९.७ (१४.४), अमरावती २७.६ (१४.३), बुलढाणा २८.० (१३.५), ब्रह्मपूरी ३१.४ (१३.६), चंद्रपूर २७.६(१२.२), गडचिरोली २९.० (१२.६), गोंदिया २७.१ (१२.४), नागपूर २८.९(१२.१), वर्धा २८.५(१३.०), वाशीम २९.८ (१२.६), यवतमाळ २९.० (११.५).

दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाचा अंदाज

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात दक्षिण श्रीलंके जवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. यातच राज्याच्या दक्षिण भागात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १७) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

विजांसह पावसाची शक्यता :

रत्नागिरी, सांताक्रुझ, सातारा, कोल्हापूर, सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT