Cold Weather Agrowon
हवामान

Cold Weather Update : फेब्रुवारी महिन्यात थंडी कमीच राहणार

Weather Update : जानेवारी महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात वाढलेली हुडहुडी वगळता यंदा हंगामात थंडी कमीच आहे.

अमोल कुटे

Pune News : जानेवारी महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात वाढलेली हुडहुडी वगळता यंदा हंगामात थंडी कमीच आहे. फेब्रुवारी महिन्यात देशात किमान तापमान सरासरीच्या वर राहणार आहे. त्यामुळे गारठा कमी राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रात किमान तापमान, तसेच पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

फेब्रुवारी महिन्यातील किमान तापमान आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने गुरुवारी (ता. १) जाहीर केला. त्यानुसार देशाच्या बहुतांश भागात किमान तापमान सरासरी पेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश वगळता उर्वरित देशभरात थंडीच्या लाटा न येण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

तर वायव्य भारत, पश्चिम मध्य भारत, ईशान्य भारत, पूर्व मध्य भारतात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक तर महाराष्ट्राच्या बहुतांश भागासह दक्षिण द्वीपकल्प, पूर्व मध्य भारतात कमाल तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरात सध्या तीव्र ‘एल- निनो’ स्थिती आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे.

फेब्रुवारी अखेरपर्यंत ‘एल-निनो’ स्थिती कायम राहणार आहे. त्यानंतर ही स्थिती हळूहळू निवळण्याची शक्यता आहे. तर इंडियन ओशन डायपोल (आयओडी) धन स्थितीत (पॉझिटिव्ह) असून, पुढील दोन महिन्यात ही स्थिती देखील निवळून जाण्याचा अंदाज आहे.

सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज

फेब्रुवारी महिन्यात देशात ११९ टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजेच सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. १९७१ ते २०२० या कालावधीतील दीर्घकालीन सरासरीनुसार फेब्रुवारी महिन्यात देशात सरासरी २२.७ मिलिमीटर पाऊस पडतो.

उत्तर भारतात पावसाचे प्रमाण अधिक म्हणजे ६५ मिलिमीटर असते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक, तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT