Winter Season Agrowon
हवामान

Maharashtra Winter Season : किमान तापमानात वाढ, थंडी ओसरली

Maharashtra Weather Forecast : किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीची लाट ओसरली आहे. राज्यात गारठा कमी-अधिक होत असतानाच अनेक भागांत धुक्याची दुलई पाहायला मिळत आहे.

अमोल कुटे

Pune News : किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीची लाट ओसरली आहे. राज्यात गारठा कमी-अधिक होत असतानाच अनेक भागांत धुक्याची दुलई पाहायला मिळत आहे. शनिवारी (ता.२१) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी ८.८ अंश तापमान नोंदले गेले. आज (ता. २२) राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहून गारठा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात असलेले कमी दाब क्षेत्र तीव्र (डिप्रेशन) झाले आहे. उत्तर आणि ईशान्येकडे सरकताना आज (ता. २२) या प्रणालीची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका पुन्हा वाढू लागला आहे. शनिवारी (ता. २१) पंजाबच्या ‘आदमपूर’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या वर गेल्याने थंडीची लाट कमी झाली आहे. धुळे, निफाड, परभणी कृषी विद्यापीठ येथे किमान तापमान १० अंशांच्या खाली असले तरी उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान १५ अंशांच्या पुढे गेल्याचे दिसून आले. पहाटेच्या वेळी धुक्याची चादर आणि दव पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

शनिवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.२ अंश तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने राज्यात थंडी ओसरली असली तरी हवेतील गारठा टिकून आहे. महिनाअखेरीस राज्यात ढगाळ आकाश, पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता असून, राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शनिवारी (ता. २१) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदविले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.१ (१६.४), अहिल्यानगर ३१ (१३.७), धुळे ३० (८.८), जळगाव २९.६ (१२), कोल्हापूर २९.८ (१८.६), महाबळेश्वर २५.८ (१३.८), मालेगाव २७.६ (१२.४), नाशिक ३०.४ (१२.४), निफाड २९.५ (९.५), सांगली ३१.३ (१७.२), सातारा ३१.७ (१४.५), सोलापूर ३३.२ (१८.८), सांताक्रूझ २९ (१९.१), डहाणू २६.९ (१६.८), रत्नागिरी ३० (१९.७), छत्रपती संभाजीनगर ३१ (१४.४), बीड - (१४.१), धाराशिव ३१.१ (१४.४),

परभणी ३२ (१६.१), परभणी कृषी विद्यापीठ ३१.५ (९.७), अकोला ३२.२ (१४.०), अमरावती ३०.६ (१६.१), भंडारा ३०(१७.४), बुलडाणा ३०(१५.२), ब्रह्मपुरी ३३.४ (१८.३), चंद्रपूर ३१.२ (-), गडचिरोली ३०.४ (१६), गोंदिया ३१.२ (१७.६), नागपूर ३१.१ (१५.८), वर्धा ३१.५ (१६.५), वाशीम ३१.६ (१६.२), यवतमाळ ३१.७ (-).

१० अंशापेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :

धुळे ८.८, निफाड ९.५, परभणी (कृषी) ९.७.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT