Cold Weather Agrowon
हवामान

Cold Weather Update : गारठा वाढण्याची शक्यता

Winter Update : उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात किमान तापमानाचा पारा १५ अंशांच्या खाली आला आहे.

अमोल कुटे

Pune News : पावसाला पोषक हवामान निवळताच आकाश निरभ्र झाले आहे. राज्याच्या तापमानात चढ-उतार होत आहेत. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात किमान तापमानाचा पारा १५ अंशांच्या खाली आला आहे. आज (ता. १८) राज्याच्या किमान तापमानात पुन्हा घट होत गारठा हळूहळू वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मालदीव आणि लगतच्या विषूववृत्ताजवळच्या हिंद महासागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वरील प्रणालीपासून आग्नेय अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. रविवारी (ता. १७) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १२.६ अंश तापमानाची नोंद झाली.

जळगाव, परभणी (कृषी), गडचिरोली, गोंदिया, ब्रह्मपूरी, नागपूर, अमरावती येथे किमान तापमान १५ अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्याच्या किमान तापमानात घट होत आहे.

राज्याच्या कमाल तापमानाचा पारा हळूहळू घसरत असला तरी, रविवारी (ता. १७) मुंबईतील सांताक्रुझ येथे ३५.३ तर सोलापूर येथे ३५ अंशांवर आहे. आज (ता. १८) राज्यात मुख्यतः निरभ्र आकाश होत कमाल तापमानात चढ- उतार होण्याचा, तर किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

रविवारी (ता. १७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.५ (१८.३), अहिल्यानगर ३१.१ (१७.५), धुळे - (१२.६), जळगाव ३३.४ (१४.८), कोल्हापूर ३१.१ (२१.१), महाबळेश्वर २५.२ (१५.९), नाशिक ३१.३ (१७.७), निफाड ३०.५ (१५.५), सांगली ३१.७ (२१.०), सातारा ३०.२ (२०.६), सोलापूर ३५.० (२१.४), सांताक्रूझ ३५.३ (२४.८), डहाणू ३१.० (२२.९), रत्नागिरी ३४.९ (२५.०),

छत्रपती संभाजीनगर ३२.० (१६.४), धाराशिव - (२०.४), परभणी ३२.२ (१६.५), परभणी कृषी विद्यापीठ ३२.२ (१३.२), अकोला ३३.१ (१७.०), अमरावती - (१४.९), बुलढाणा ३०.६ (१६.६), ब्रह्मपूरी ३३.१ (१४.८), चंद्रपूर ३०.६ (१६.८), गडचिरोली २९.४ (१४.६), गोंदिया ३०.२ (१४.६), नागपूर ३१.६ (१४.८), वर्धा ३१.८ (१६.१), वाशीम ३४.४ (-), यवतमाळ ३१.५ (१६.०).

१५ अंशापेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :

धुळे १२.६, परभणी (कृषी) १३.२, गडचिरोली १४.६, गोंदिया १४.६, जळगाव १४.८, ब्रह्मपूरी १४.८, नागपूर १४.८, अमरावती १४.९.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra ST Bus Service Issues: राजकारणासाठी एसटी प्रवासी वेठीला

MAGNET Projects Schemes: ‘मॅग्नेट’अंतर्गत विविध योजनांचा लाभ घ्यावा

Neem Research Centre: भिडीत कडुलिंब संशोधन केंद्र होणार

MSCB Profit: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला ७०२ कोटींचा नफा

NABARD Experience Centre: मुंबईत नाबार्डच्या अनुभव केंद्राचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT