Cold Weather Agrowon
हवामान

Cold Weather Update : राज्यात गारठा कमी होण्याची शक्यता

Maharashtra Weather Update : किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यात थंडी कमी होत आहे. आज (ता. २) राज्यात गारठा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune News : किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यात थंडी कमी होत आहे. आज (ता. २) राज्यात गारठा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यातच निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ९.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

उत्तर भारतात थंडी कमी अधिक होत आहे. गुरुवारी (ता. १) उत्तर प्रदेशातील फुरसतगंज यथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १.० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, सिक्कीम, पश्चिम बंगालमध्ये किमान तापमान ९ ते १२ अंशांदरम्यान आहे. हिमाचल प्रदेश, उत्तरखंड, पंजाब, हरियाना, चंडीगड, उत्तर प्रदेशात गारपीट होण्याची शक्यता आहे.

राज्याच्या तापमानात वाढ झाली असून, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडी आहे. गुरुवारी (ता. १) निफाड वगळता उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या वरच आहे. किमान तापमानाचा पारा १० ते २० अंशांच्या दरम्यान आहे. आज (ता. २) किमान तापमानात वाढ होत गारठा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरुवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.५ (१०.९), धुळे ३०.० (११.२), जळगाव ३२.२ (११.१), कोल्हापूर ३३.५ (१४.५), महाबळेश्वर २५.६ (१०.६), मालेगाव ३१.२ (१४.४), नाशिक २९.७ (११.८), निफाड २९.१ (९.१), सांगली ३१.७ (१५.५), सातारा ३२.४ (११.२), सोलापूर ३४.६(१८.८), सांताक्रूझ ३१.३ (१९.८), डहाणू २८.५ (१६.६), रत्नागिरी ३०.८ (१७.९),

छत्रपती संभाजीनगर ३०.२ (१५.८), नांदेड ३१.८ (१९.०), परभणी ३२.१ (१६.७), अकोला ३१.८ (१६.५), अमरावती ३१.० (१६.७), बुलडाणा ३०.० (१५.०), ब्रह्मपुरी ३१.८ (१७.६), चंद्रपूर ३१.२ (१६.६), गडचिरोली ३०.६ (१६.०), गोंदिया २८.७ (१७.२), नागपूर २९.८(१७.२), वर्धा ३०.५(१७.६), वाशीम ३२.० (१५.२), यवतमाळ ३१.५ (१५.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Plastic Flower Ban : प्लास्टिक फुलांच्या बंदीबाबत विशेष सूचना काढणार; मुख्यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

Rotavator Maintenance: रोटाव्हेटरची योग्य देखभाल कशी करावी? शेतकऱ्यांसाठी सोप्या टिप्स

Fruit Harvesting Tools: फळे काढणीस उपयुक्त आधुनिक साधने

Experimental Farming: तरुणांनी प्रयोगशील शेतीकडे लक्ष द्यावे

Kolhapuri Barrage: कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रूपांतर करा

SCROLL FOR NEXT