Winter Agrowon
हवामान

Maharashtra Winter : थंडी कमी राहणार

Winter Forecast : यंदाच्या हिवाळ्यात (डिसेंबर ते फेब्रुवारी) महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांशी भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे.

अमोल कुटे

Pune News : यंदाच्या हिवाळ्यात (डिसेंबर ते फेब्रुवारी) महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांशी भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. थंडीच्या लाटा सरासरीपेक्षा कमी येणार असल्याने यंदा थंडी कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. डिसेंबर महिन्यात देखील किमान आणि कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या वर राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हिवाळा हंगामातील (डिसेंबर ते फेब्रुवारी) तापमानाचा अंदाज, तसेच डिसेंबर महिन्यातील कमाल, किमान तापमान आणि पावसाचा अंदाज वर्तविण्यासाठी सोमवारी (ता. २) आयोजित पत्रकार परिषदेत हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी ही माहिती दिली.
यंदा नोव्हेंबर महिन्यात देखील किमान तापमान सरासरीच्या वरच राहिले आहे.

महिन्याच्या अखेरीस राज्यात गारठा वाढल्याने तापमानाचा पारा ६ अंशांपर्यंत घसरला होता. मात्र बंगालच्या उपसागरात आलेल्या फेइंगल चक्रीवादळामुळे झालेल्या ढगाळ हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात मोठी वाढ झाली. उत्तर महाराष्ट्र वगळता राज्याच्या अनेक भागात गुलाबी थंडीची प्रतीक्षा कायम आहे.

यंदाच्या हिवाळ्यात (डिसेंबर ते फेब्रुवारी) देशाच्या बहुतांश भागात किमान तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक आहे. तर कमाल तापमान देखील अधिक राहणार असून, दक्षिणेकडील राज्यात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी राहण्याचे संकेत आहेत. हिवाळा हंगामात थंडीच्या लाटेचे दिवस सरासरीपेक्षा कमी राहणार आहेत. परिणामी वायव्य, मध्य, पूर्व आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी थंडीच्या लाटा येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

डिसेंबर महिन्यात देशाच्या बहुतांशी भागात किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. तसेच थंडीच्या लाटा देखील कमीच राहणार आहेत. डिसेंबर महिन्यात दक्षिणेकडील राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रासह देशाच्या मध्य आणि दक्षिण भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

प्रशांत महासागरात ‘ला-नीना’चे संकेत

प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सध्या सरासरीपेक्षा कमी असून, तटस्थ एल-निनो स्थिती आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात ‘ला- नीना’ स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत. तसेच इंडियन ओशन डायपोल (आयओडी) देखील तटस्थ स्थितीत असून, पुढील काही महिन्यात ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmers Issue: कांद्याच्या प्रश्‍नावर ठोस तोडगा नाही

Khandesh Banana Price: खानदेशात केळीचे दर स्थिर; कमाल भाव २४०० रुपयांपर्यंत

Kisan Sabha Protest: कांद्याला तीन हजार रुपये भावासाठी किसान सभेचे आंदोलन

Pune Dam Water Storage: पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक

Water Crisis Protest: पाण्यासाठी रणरणत्या उन्हात शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा

SCROLL FOR NEXT