Cold Weather Agrowon
हवामान

Cold Weather Update : विदर्भ, उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी

Winter Update : उत्तर भारतातील थंडीच्या आक्रमणाने विदर्भासह उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी भरली आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तर भारतातील थंडीच्या आक्रमणाने विदर्भासह उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी भरली आहे. महाराष्ट्राच्या इतर भागतंतही तापमान घसरल्याने गारठा वाढला आहे. यंदाच्या हंगामात पारा प्रथमच १० अंशांच्या खाली घसरला आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात हंगामातील नीचांकी ८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

मंगळवारी (ता. १९) पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानचा काही भाग, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड आणि उत्तर झारखंडमध्ये अनेक भागांत किमान तापमान ५ ते १० अंशांच्या दरम्यान आहे.

राज्याच्या किमान तापमानातही घट कायम असल्याने विदर्भासह, उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी भरली आहे. तर मराठवाडा, उर्वरित मध्य महाराष्ट्रात थंडी वाढत आहे. विदर्भात अनेक ठिकाणी तापमान १० अंश किंवा त्यापेक्षा खाली आले आहे.

गोंदिया आणि यवतमाळ येथे किमान तापमान ९ अंश, नागपूर येथे ९.४, तर वाशीम येथे १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोकणासह दक्षिणेकडील जिल्ह्यात किमान तापमान अद्यापही १५ अंशांच्या वरच आहे. आज (ता. २०) विदर्भासह राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे २७.५ (१५.२), धुळे २६ (८.६), जळगाव २६.४ (१४.४), कोल्हापूर २७.६ (१९), महाबळेश्‍वर २२.५ (१२.६), नाशिक २४.३ (१४), निफाड २८.४ (१२.१), सांगली २७.५ (१८.९), सातारा २८.२ (१६.५), सोलापूर २९.१ (१८), सांताक्रूझ ३२.९ (२३.७), डहाणू ३०.६ (२०.९), रत्नागिरी ३४.१ (२४.९),

छत्रपती संभाजीनगर २६.२ (१५.९), नांदेड २५.२ (१६.२), परभणी २७.५ (१३.५), अकोला २८ (१३.५), अमरावती २६.४ (१२.५), बुलडाणा २५ (१२.८), ब्रह्मपुरी २८.१ (११.४), चंद्रपूर २६.६(११), गडचिरोली २८ (१०.८), गोंदिया २५.४ (९), नागपूर २६.८ (९.४), वर्धा २५.९(११.४), वाशीम २६.४ (१०), यवतमाळ २७.२ (९).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत हटणार नाही! भिलवडीत राजू शेट्टींचे कोरड्या कृष्णा नदीपात्रात ठिय्या आंदोलन

Banana Farmers : केळीच्या दांड्याचे वजन ठरतेय तोट्याचे; खरेदीदारांच्या मनमानीमुळे बळीराजा त्रस्त!

Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश

SCROLL FOR NEXT