Cold Weather Agrowon
हवामान

Cold Weather Update : उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला

Maharashtra Weather News : राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत असल्याने किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत असल्याने किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम असून, धुळे आणि निफाड येथे किमान तापमानाचा पारा पुन्हा १० अंशांच्या खाली घसरले आहे.

आज (ता. २२) मध्य महाराष्ट्रात गारठा कायम राहण्याची, उर्वरित राज्यात किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका सातत्याने कमी-अधिक होत आहे. रविवारी (ता. २१) हरियानातील हिस्सार यथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी २.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेशात किमान तापमान ३ ते ७ अंशांच्या दरम्यान आहे. उत्तर भारतात धुके, थंडीची लाट, थंड दिवस ही हवामान स्थिती कायम आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, दक्षिण अंतर्गत कर्नाटकपासून मराठवाडा, विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात ढगाळ हवामान होत असून, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान आहे.

उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम असून, धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा ११ ते २० अंशांच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रात गारठा कायम राहणार असून, उर्वरित राज्यात किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता कायम आहे.

रविवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३०.७ (१२.८), धुळे २८.० (७.६), जळगाव २९.८ (१०.२), कोल्हापूर ३०.१ (१७.५), महाबळेश्वर २५.१ (१४.०), नाशिक २९.१ (१२.०), निफाड २८.० (९.०), सांगली ३०.६ (१७.६), सातारा २९.७ (१४.०), सोलापूर ३३.२(१८.४), सांताक्रूझ २८.६ (१२.६), डहाणू २८.५ (१६.४), रत्नागिरी ३१.० (१९.३),

छत्रपती संभाजीनगर २८.६ (१२.६), नांदेड ३१.४ (१९.६), परभणी ३२.५ (१६.७), अकोला ३०.८ (१५.५), अमरावती २९.२ (१५.५), बुलडाणा २९.२ (१२.८), ब्रह्मपुरी ३०.४ (१८.६), चंद्रपूर ३०.४ (१५.०), गडचिरोली २९.४ (१५.२), गोंदिया २७.५ (१४.५), नागपूर २९.०(१६.५), वर्धा २९.२(१७.२), वाशीम ३१.२ (१४.२), यवतमाळ ३१.० (१५.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT