Winter Season Agrowon
हवामान

Cold Weather Update : उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी

Weather Update Maharashtra : उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी महाराष्ट्राकडे कूच केल्याने राज्यात पारा घसरू लागला आहे. उत्तर महाराष्ट्रात पारा १० अंशांच्या खाली येत थंडीचा कडाका वाढल्याने हुडहुडी भरली आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी महाराष्ट्राकडे कूच केल्याने राज्यात पारा घसरू लागला आहे. उत्तर महाराष्ट्रात पारा १० अंशांच्या खाली येत थंडीचा कडाका वाढल्याने हुडहुडी भरली आहे.

निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्याचे यंदाच्या हंगामातील नीचांकी ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. १६) राज्यात थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असून, रविवारी (ता. १४) पंजाबच्या लुधियाना येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये दाट धुक्याचे साम्राज्य पाहायला मिळाले. तसेच आज (ता. १६) पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली राज्यात थंडीची तीव्र लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

राज्यात किमान तापमानात घट होऊ लागली असून, निफाडपाठोपाठ धुळे येथील कृषी महाविद्यालयात ७.४ अंश सेल्सिअस, तर जळगाव येथे ९.९ तापमानाची नोंद झाली. कोकण वगळता उर्वरित राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान १२ ते १७ अंशांच्या दरम्यान आहे. राज्यात किमान तापमानात घट होत थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सोमवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.८ (१२.२), धुळे ३१.० (७.४), जळगाव ३१.४ (९.९), कोल्हापूर ३२.६ (१९.५), महाबळेश्वर २७.७ (१४.५), नाशिक ३०.६ (११.१), निफाड २९.० (६.५), सांगली ३३.३ (१७.३), सातारा ३२.१ (१५.०), सोलापूर ३४.८(१७.०), सांताक्रूझ ३४.६ (१८.७), डहाणू ३१.० (१७.०), रत्नागिरी ३४.३ (२०.२),

छत्रपती संभाजीनगर ३०.८ (१०.२), नांदेड ३१.८ (१५.४), परभणी ३१.८ (१४.६), अकोला ३२.५ (१३.०), अमरावती ३१.२ (१२.५), बुलडाणा ३०.७ (१२.२), ब्रह्मपुरी ३२.८ (१७.९), चंद्रपूर ३२.० (१५.४), गडचिरोली ३०.० (१४.८), गोंदिया ३०.४ (१५.४), नागपूर ३१.४(१६.६), वर्धा ३२.०(१५.९), वाशीम ३२.४ (११.४), यवतमाळ ३३.० (१२.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT