Cold Weather` Agrowon
हवामान

Cold Weather Update : राज्यात गारठा कायम राहण्याचा अंदाज

Winter Update : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरू असून, कायम असल्याने विदर्भासह, उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तर भारतातील थंड वाऱ्यामुळे राज्याच्या तापमानात घट झाली आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात गारठा कायम असून, किमान तापमानात चढ - उतार सुरूच आहेत. शुक्रवारी (ता. २२) परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठात ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. २३) राज्यात गारठा कायम राहण्याचा अंदाज आहे.

शुक्रवारी (ता. २२) राजस्थान मधील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी २.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि अंतर्गत ओडिशामध्ये अनेक भागात किमान तापमान ४ ते ८ अंशांच्या दरम्यान आहे. पंजाबमध्ये थंडीची लाट आली असून, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, त्रिपुरा राज्यात दाट धुके होते.

राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरू असून, कायम असल्याने विदर्भासह, उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. शुक्रवारी (ता. २२) परभणी कृषी विद्यापिठासह धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव येथे तापमान १० अंश किंवा त्यापेक्षा खाली कायम आहे. आज (ता. २३) विदर्भासह राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे २९.५ (१३.३), धुळे ३०.० (९.०), जळगाव २८.५ (१०.०), कोल्हापूर २९.४ (१७.२), महाबळेश्वर २८.१ (१५.९), नाशिक २८.७ (-), निफाड २८.० (१४.६), सांगली २९.६ (१७.७), सातारा ३१.५ (१५.३), सोलापूर ३१.६(१४.१), सांताक्रूझ ३३.१ (२१.९), डहाणू ३१.२ (२१.१), रत्नागिरी ३५.४ (२१.७),

छत्रपती संभाजीनगर २८.४ (१२.९), नांदेड २८.४ (१३.०), परभणी २८.४ (१२.०), अकोला २९.९ (१४.६), अमरावती २८.६ (१२.८), बुलढाणा २९.५ (१४.४), ब्रह्मपूरी २९.८ (११.१), चंद्रपूर २७.८(१०.८), गडचिरोली २६.० (९.४), गोंदिया २६.८ (९.५), नागपूर २७.२(११.५), वर्धा २७.५(१२.०), वाशीम ३०.० (१२.२), यवतमाळ ३०.० (१०.५).

१० अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :

परभणी (कृषी) ८.५, धुळे ९.०, गडचिरोली ९.४, गोंदिया ९.५, जळगाव १०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT