Cold Weather Agrowon
हवामान

Cold Weather Update : उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम

Winter Season : राज्यात थंडीचा कडाका कमी-अधिक होत आहे. राज्यात गारठा कायम असून, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी तापमानाचा पारा १० अंशाच्या खाली आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात थंडीचा कडाका कमी-अधिक होत आहे. राज्यात गारठा कायम असून, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी तापमानाचा पारा १० अंशाच्या खाली आहे. राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, गारठा काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नैॡत्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ चक्राकार वाऱ्यांची स्थिती दक्षिणेकडे सरकून गेली आहे. उत्तर भारतात थंडी कमी झाली असून, रविवारी (ता. २४) पंजाब येथील अमृतसर, हरियानातील भिवणी, नर्नूल येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये अनेक भागात किमान तापमान ६ ते ९ अंशांच्या दरम्यान आहे.

राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरू असून, विदर्भासह, उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. रविवारी (ता. २४) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, निफाड येथील गहू संशोधन केंद्र, गडचिरोली येथे १० अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. आज (ता. २५) राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

रविवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.३ (११.३), धुळे ३२.० (८.५), जळगाव ३१.० (१२.६), कोल्हापूर ३०.१ (१६.३), महाबळेश्वर २६.९ (१५.०), नाशिक ३०.५ (१३.६), निफाड २९.४ (९.१), सांगली ३०.६ (१४.२), सातारा ३१.७ (१३.४), सोलापूर ३२.२(१५.९), सांताक्रूझ ३४.७ (१८.९), डहाणू ३०.४ (१८.८), रत्नागिरी ३६.१ (२०.५),

छत्रपती संभाजीनगर २९.६ (११.८), नांदेड ३०.२ (१५.०), परभणी ३०.१ (१२.२), अकोला ३२.० (१३.३), अमरावती ३०.६ (१३.०), बुलडाणा ३१.० (१४.०), ब्रह्मपुरी ३१.८ (१३.०), चंद्रपूर २८.८(११.२), गडचिरोली २८.० (९.८), गोंदिया २८.५ (१२.२), नागपूर २९.५(१३.२), वर्धा २९.५(१३.०), वाशीम ३०.६ (१२.०), यवतमाळ ३१.२ (१२.२).

१० अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :

धुळे ८.५, निफाड ९.१, परभणी (कृषी) ९.५, गडचिरोली ९.८.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT