Winter Season Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update: उत्तर भारतात थंडी पुन्हा वाढली; राज्यातील बहुतांशी भागात थंडीचा कडाका कमीच

Winter Weather Forecast: राज्यात थंडी अद्यापही कमीच आहे. किमान तापमानात झालेल्या वाढीचा परिणाम थंडीवर दिसून येत आहे. या परिस्थितीचा राज्यातील रब्बी पिकांवरही परिणाम होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Anil Jadhao 

Pune News: राज्यात थंडी अद्यापही कमीच आहे. किमान तापमानात झालेल्या वाढीचा परिणाम थंडीवर दिसून येत आहे. या परिस्थितीचा राज्यातील रब्बी पिकांवरही परिणाम होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तर राज्यातील तापमानात आणखी काही दिवस चढ उतार राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

जानेवारी महिन्यात राज्यात थंडीचे प्रमाण कमीच राहीले आहे. राज्यातील बहुतांशी भागात गुलाबी थंडी जाणवली नाही. उत्तर भारतातून थंडी वाऱ्यांचे कमी झालेले प्रवाह आणि राज्यातील ढगाळ वातावरणाचा परिणाम थंडीवर दिसून आला. मागील काही दिवसांपासून राज्यातील किमान तापमान १० अंशाच्याही पुढे गेले आहे. त्यामुळे थंडी कमी असून दुपारी काही भागात उन्हाचा चटकाही जाणवत आहे.

उत्तर भारतातही थंडीचा कडाका कमी जास्त होत आहे. आज पंजाब, हरियाना, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात थंडी वाढली होती. तर धुक्याची चादरी अनेक भागात कायम आहे. आज राजस्थानातील फतेहपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दक्षिण भारतातील ईशान्य मोसमी वाऱ्यांचा (ईशान्य मॉन्सून) हंगाम समाप्त होत आहे. तर पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे ईशान्य अरबी समुद्र पासून दक्षिण राजस्थानपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या सर्व परिस्थितीचा हवामानावर परिणाम होत आहे.

उत्तर भारतातून थंड वाऱ्यांचे प्रवाह खंडीत झाल्याने आणि ढगाळ हवामानामुळे राज्यात थंडी कमी झाली आहे. राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमान वाढले आहे. आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर राज्यातील तापमानात चढ उतार कायम राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT