Winter Season Agrowon
हवामान

Maharashtra Cold Wave : राज्यात थंडीचा कडाका वाढला; बहुतांशी भागात किमान तापमानात झाली घट

Weather Forecast : राज्यात पुन्हा थंडी वाढली आहे. उत्तर भारतातून थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात थंडी पसरली आहे. राज्यात काही ठिकाणी किमान तापमान १० अंशाच्या दरम्यान पोचले आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात पुन्हा थंडी वाढली आहे. उत्तर भारतातून थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात थंडी पसरली आहे. राज्यात काही ठिकाणी किमान तापमान १० अंशाच्या दरम्यान पोचले आहे. तर पुढील आठवडाभर राज्यात थंडी राहील, असा अंदाज आहे. 

उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. तर काही ठिकाणी दाट धुकेही जाणवत आहे. उत्तर भारतातील या स्थितीचा परिणाम राज्यातही जाणवत आहे. राज्यात उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका चांगलाच जाणवत आहे. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात आज ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  जळगाव येथे १०.२ अंश सेल्सिअस तर नाशिक येथे १०.४ अंश सेल्सिअस तापमान होते.

हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, उत्तर भारतातून पश्चिम मध्यप्रदेशापर्यंत पोहोचलेल्या थंडीच्या लाटेमुळे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या चार जिल्ह्यांमध्ये पहाटेच्या किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशाने कमी होऊन ८ ते ९ अंशांपर्यंत जाणवत आहे.

यामुळे नंदुरबार धुळे जिल्ह्याच्या काही भागात साधारण दवांक बिंदू तापमान व आर्द्रते मुळे खालावलेल्या किमान तापमानाला त्या ठिकाणी जमिनीवर भू -स्फटिकीकरण झाले आहे. मात्र तेथील दुपारचे कमाल तापमान हे केवळ २८ ते ३० अंशाच्या दरम्यान जाणवत असल्यामुळे रब्बीच्या शेत पिकांना सध्या फायदा होत आहे. 

उत्तर महाराष्ट्र वगळता सध्या महाराष्ट्रातील पहाटे ५ वाजेचे किमान व दुपारी ३ वाजेचे कमाल अशी दोन्हीही तापमाने सरासरी इतकी आहे. भागपरत्वे किमान १० ते १४ तर कमाल २८ ते ३० अंशाच्या दरम्यान जाणवत आहे, असेही श्री खुळे यांनी सष्ट केले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT