Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather: उत्तरेकडे शीतलहरी, दक्षिणेकडे उष्णतेचा कहर! महाराष्ट्रात हवामानाचा अनोखा खेळ

Temperature Fluctuation: महाराष्ट्रात एकाच वेळी दोन वेगवेगळ्या हवामानाच्या टोकाची नोंद झाली आहे. निफाडमध्ये तापमान ४.२ अंशांवर घसरले, तर मुळदे येथे ४०.५ अंशांपर्यंत उष्णतेचा कहर वाढला. बदलत्या हवामानामुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Team Agrowon

Pune News: बदलत्या हवामानाची विविध रूपे पाहायला मिळत आहेत. राज्याच्या उत्तरेकडे असलेल्या जिल्ह्यात पहाटे कडाक्याची थंडी तर दक्षिणेकडे असलेल्या जिल्ह्यात अंगाची लाही करणारी उन्हाची ताप असे हवामान अनुभवायला मिळत आहे. गुरुवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये निफाड (जि. नाशिक) येथे राज्यातील नीचांकी किमान ४.२ अंश तर मुळदे (जि. सिंधुदुर्ग) येथे यंदाच्या हंगामातील राज्याचे उच्चांकी कमाल ४०.५ अंश तापमान नोंदले गेले.

यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा वाढल्या. उत्तरेकडील वाऱ्यांच्या अभावामुळे किमान तापमानातही वाढ झाल्याने थंडी गायब झाली. मात्र गेल्या दोन दिवसांत उत्तरेकडील गार वाऱ्यांच्या आगमनाने पहाटेच्या तापमानात अचानक मोठी घट दिसून आली. हिमालयाकडील थंड वारे थेट महाराष्ट्राकडे आल्याने थंडी वाढली.

गुरुवारी (ता. ६) पारा १० अंशांखाली आल्याने शीत लहरींचे आगमन होत हुडहुडी वाढली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ४.२ अंश सेल्सिअस तापमानाची, परभणी येथील कृषी विद्यापीठात ७.२ अंश, धुळे येथील कृषी महाविद्यालयात ७.५ अंश तसेच जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर येथे किमान तापमान १० अंशांवर होते.

दरम्यान, सूर्य तळपायला लागल्याने राज्याच्या कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला असून, पारा ३७.५ अंशांच्या पार गेल्याने या भागात उष्णतेची लाट आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुळदे येथे यंदाच्या हंगामातील उंचाकी ४०.५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. फोंडाघाट संशोधन केंद्रावर देखील ४० अंशांची नोंद झाली. यातच सोलापूर, सांताक्रूझ येथे तापमान ३८ अशांपार तर सांगली, वाशीम, रत्नागिरी, कोल्हापूर येथे पारा ३७ अंशांवर असल्याचे दिसून आले.

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---११.४---३७.६

मराठवाडा---७.२---३६.३

पश्‍चिम महाराष्ट्र---१३.४---३८.२

उत्तर महाराष्ट्र---४.२---३३.१

कोकण---१८.०---४०.५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT