Cold Weather Agrowon
हवामान

Maharashtra Rain : उत्तरेतील राज्यांमध्ये थंडीची लाट; राज्यातील काही भागात तापमानात वाढ

Weather Update : उत्तरेतील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. अनेक भागात दाट धुक्याची चादरही दिसून येत आहे. राज्यात मात्र किमान तापमान अजूनही सरासरीपेक्षा जास्तच आहे.

Anil Jadhao 

Pune News : उत्तरेतील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. अनेक भागात दाट धुक्याची चादरही दिसून येत आहे. राज्यात मात्र किमान तापमान अजूनही सरासरीपेक्षा जास्तच आहे. 

उत्तर भारतातील काही भागात थंडीची लाट आहे. पूर्व राजस्थान, पंजाबमध्ये थंडीची लाट आहे. तसेच हरियाना आणि पश्चिम राजस्थानमधील काही भागातही थंडीची लाट आहे. पंजाबमधील अमृतसर येथे किमान १.४ अंशाची नोंद झाली होती.

तर पंजाब, हरियाना, चंदीकड, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेश, दक्षिण राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश तसेच बिहारच्या काही भागात किमान तापमान ३ ते ७ अंशाच्या दरम्यान होते. यासोबतच हरियाना, चंदीगड, दिल्लीच्या काही भागात दाट धुक्याची चादर पसरली होती. 

राज्यातही काही भागात पुन्हा थंडीत वाढ झाल्याचे दिसते. पण राज्यातील अनेक भागात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्तच होती. उत्तरेकडे थंडीचा कडाका कायम असल्याने राज्यात पुढील काही दिवसांमध्ये थंडी पुन्हा हातपाय पसरवू शकते. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये अनेक भागात किमान तापमान कमी झालेले दिसू शकते, असा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bharat-VISTAAR AI : 'भारत-विस्तार एआय' १७ फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते उद्घाटन

Rural Entrepreneurship: भूम येथे बुधवारी खरेदीदार विक्रेता संमेलन

Jaggery Making Safety: गुऱ्हाळघरात अन्नसुरक्षा, स्वच्छतेची घ्यावयाची काळजी

Sugarcane Season: ऊस गाळपातून जिल्ह्यात कोट्यवधींची उलाढाल

Pulses Storage: डाळींच्या कीडमुक्त साठणुकीसाठी सोपा घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT