Cold Weather Agrowon
हवामान

Maharashtra Cold : उत्तर भारतात थंडीची लाट; राज्यातील किमान तापमान घटण्याचा अंदाज

Weather Update : राज्यातील हवामानात थंडी वाढली आहे. किमान तापमानात अनेख ठिकाणी घट झाली. किमान तापमानात सर्वाधिक घट मराठवाड्यात झाल्याचे दिसते. तर कमाल तापमानात सर्वाधिक घट मालेगाव येथे दिसते.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील अनेक भागात कमाल तापमानात घट झाली आहे. तर काही ठिकाणी किमान तापमानातही घट नोंदली गेली. उत्तर भारतातील थंडीचा कडाका कायम असून थंडी आणखी वाढण्याचा आहे.

राज्यातील हवामानात थंडी वाढली आहे. किमान तापमानात अनेख ठिकाणी घट झाली. किमान तापमानात सर्वाधिक घट मराठवाड्यात झाल्याचे दिसते. तर कमाल तापमानात सर्वाधिक घट मालेगाव येथे दिसते.

राज्यातली थंडी वाढल्याने गावांमध्ये शेकोट्या पेटत आहेत. रात्रीही थंडीचा कडाका वाढला. पुढील काळात थंडी आणखी वाढण्याचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

उत्तर भारतातील थंडीचा कडाका वाढला. पंजाब, हरियाना, चंदीगड, दिली, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील मधील बहुतेक भागात किमान तापमान ४ अंश सेल्सिअस ते ८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

तसेच उत्तर प्रदेश, दक्षिण राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि बिहारमधील बहुतेक भागात ८ अंश सेल्सिअस ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमानाची नोंद झाली. पंजाबमधील काही भागात सकाळच्या काळात दाट धुके पडत आहे. तर पंजाबमधील काही भागात थंडीची लाटही आहे, असे हवामान विभागाने स्पष्ट केले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT