Winter Weather Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा अंदाज, थंडीची वाढ आणि काही ठिकाणी धुक्याची चादर

Maharashtra Rain Forecast : आज निफाड, धुळे, नगर, बीड, जळगाव या ठिकाणी तापमान १० अंशांपेक्षा कमी होते. तर राज्यातील थंडी कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

Anil Jadhao 

Pune News : हवामान विभागाने आज आणि उद्या उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे. तर राज्यातील बहुतांशी भागात थंडी वाढली आहे.  

अनेक ठिकाणी तापमानाचा पारा १० अंशांखाली घसरला. आज निफाड, धुळे, नगर, बीड, जळगाव या ठिकाणी तापमान १० अंशांपेक्षा कमी होते. तर राज्यातील थंडी कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. 

आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत आहेत. पश्‍चिमी चक्रवातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली असून, दाट धुक्याचे साम्राज्य दिसून येत आहे.

उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातही थंडी वाढत आहे. आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात ६ अंशाची नोंद झाली होती. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ७.८ अंशाची नोंद झाली होती. 

हवामान विभागाने आज पालघर, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज दिला. तर उद्या परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT