Weather Forecast Agrowon
हवामान

Winter Season : थंडीचा कडाका कायम, पावसासाठी पोषक हवामानाचा अंदाज!

Rain Forecast : थंडी वाढत असतानाच राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १०) उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे महाराष्ट्रात थंडी परतली आहे. अनेक ठिकाणी पारा १० अंशांखाली घसरला असून, धुळे येथील कृषी महाविद्यालयात ४.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. थंडी वाढत असतानाच राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १०) उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत आहेत. पश्‍चिमी चक्रवातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली असून, दाट धुक्याचे साम्राज्य दिसून येत आहे. गुरुवारी (ता. ९) पंजाबच्या आदमपूरमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात थंडी वाढल्याने गुरुवारी (ता. ९) धुळ्यासह मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, जळगाव, नाशिक, तर मराठवाड्यातील परभणी कृषी विद्यापीठ आणि विदर्भातील नागपूर, गोंदिया, ब्रह्मपुरी, वर्धा, भंडारा येथे किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. सकाळपर्यंच्या २४ तासांत रत्नागिरी येथे ३३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १०) राज्याच्या किमान तापमानात काहीशी वाढ होण्याचा अंदाज असला, तरी गारठा कायम राहण्याचा अंदाज आहे. यातच उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता हवामान वर्तविली आहे.

गुरुवारी (ता. ९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---२९.७---१०.९

अहिल्यानगर---२८.०---९.४

धुळे---२५.५---४.४

जळगाव---२७.४---९.४

जेऊर---२९.५---१०.५

कोल्हापूर---२८.६---१६.२

महाबळेश्‍वर---२५.१---११.८

मालेगाव---२४.८---१०.२

नाशिक---२८.९---१०

निफाड---२८.४---१०.४

सांगली---३०---१६.३

सातारा---२९.३---१४.६

सोलापूर---३१.२---१६.१

सांताक्रूझ---३३.१---१७.९

डहाणू---२७.७---१७.२

रत्नागिरी---३३.५---२०.६

छत्रपती संभाजीनगर---२९---१०

धाराशिव---२८---१३.४

परभणी---२८.३---११.१

परभणी (कृषी)---२७.२---७

अकोला---२९---१०.३

अमरावती---२८---१०.१

भंडारा---२५.६---१०

बुलडाणा---२६.१---१०.५

ब्रह्मपुरी---२७.६---८.५

चंद्रपूर---२८.०---निरंक

गडचिरोली---२८.०---१०.२

गोंदिया---२५.२---८.४

नागपूर---२७.४---८.२

वर्धा---२७.१---९.६

वाशीम---२६.०---निरंक

यवतमाळ---२७.६---१०.५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT