Weather  Agrowon
हवामान

Maharashtra Cold Wave : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीची लाट कायम

Maharashtra Weather Update : उत्तरेकडील थंडी वाऱ्यांनी महाराष्ट्रावर स्वारी केल्याने महाराष्ट्रात थंडीची लाट टिकून आहे. अनेक ठिकाणी पारा १० अंशांच्या खाली घसरल्याने हुडहुडी कायम आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंडी वाऱ्यांनी महाराष्ट्रावर स्वारी केल्याने महाराष्ट्रात थंडीची लाट टिकून आहे. अनेक ठिकाणी पारा १० अंशांच्या खाली घसरल्याने हुडहुडी कायम आहे. मंगळवारी (ता. १७) धुळे येथील कृषी महाविद्यालयात सलग दुसऱ्या दिवशी राज्याचे हंगामातील नीचांकी ४ अंश तापमान नोंदले गेले. राज्यात तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

लक्षद्वीप आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती विरून गेली आहे. नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र सक्रिय असून, ही प्रणाली तमिळनाडूच्या किनाऱ्याकडे येताना ही प्रणाली आणखी तीव्र होणार आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम असल्याने मंगळवारी (ता. १७) पंजाबच्या ‘आदमपूर’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यातही थंडीची तीव्रता वाढली असून, किमान तापमान १० अंशांच्या खाली येत, सरासरी तापमानात ४.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्याने धुळे, परभणी (कृषी), जेऊर, अहिल्यानगर, निफाड, नांदेड येथे थंडीची लाट आली आहे. मालेगाव, जळगाव, सातारा, छत्रपती संभाजीनगर, परभणी, गोंदिया, नागपूर, वर्धा, ब्रह्मपुरी, गडचिरोली, भंडारा येथे किमान तापमान १० अंशांच्या खाली आल्याने गारठा टिकून आहे.

मंगळवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३३.५ अंश तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्रावर येऊन धडकत असल्याने राज्यात रात्रंदिवस गारठा जाणवत आहे. आज (ता. १८) राज्यातील थंडी कायम राहण्याची शक्यता असली, तरी किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मंगळवारी (ता. १७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे २९.७ (८), अहिल्यानगर ३० (५.७), धुळे २८ (४), जळगाव २८.८ (८.३), जेऊर ३१ (५.५), कोल्हापूर २९.५ (१४.६), महाबळेश्‍वर २७.२ (१३.७), मालेगाव २५.२ (९.८), नाशिक २९.३ (८), निफाड २८.८ (५.७), सांगली ३१.२ (११.८), सातारा ३१.३ (९.१), सोलापूर ३३ (१२.९), सांताक्रूझ ३४.८ (१५), डहाणू ३१.२ (१४.९), रत्नागिरी ३३.५ (१५.३), छत्रपती संभाजीनगर ३०.६ (१०), धाराशिव २८.८ (१०.२).

नांदेड - (७.६), परभणी २९.२ (९.४), परभणी कृषी विद्यापीठ २८ (५), अकोला ३१.४ (१०.५), अमरावती ३०.४ (११.४), भंडारा २७.८ (१०), बुलडाणा ३०.६ (११.६), ब्रह्मपुरी ३०.४ (९.६), चंद्रपूर २८.२ (-), गडचिरोली २७ (८.४), गोंदिया २७.४ (८.२), नागपूर २९ (८.२), वर्धा २९.५ (९.५), वाशीम ३०.६ (१३.६), यवतमाळ २६ (-).

थंडीची तीव्र लाट असलेली ठिकाणे :

धुळे ४, परभणी (कृषी) ५, जेऊर ५.५, अहिल्यानगर ५.७, निफाड ५.७, नांदेड ७.६, पुणे ८, नाशिक ८.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT