उत्तर भारतात थंडीची लाट; पंजाबमध्ये दहा वर्षांतील नीचांकी 
हवामान

Weather Update : उत्तर महाराष्ट्रात गारठ्यात वाढ ; जळगाव येथे पारा नीचांकी ११ अंश सेल्सिअसपर्यंत खाली

Weather Report : राज्याच्या किमान तापमानात सातत्याने घट होत असल्याने थंडीची चाहूल लागली आहे.

Team Agrowon

Pune News : राज्याच्या किमान तापमानात सातत्याने घट होत असल्याने थंडीची चाहूल लागली आहे. कमाल तापमानातही घट झाल्याने उन्हाचा चटका हळूहळू कमी होत आहे. गुरुवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील नीचांकी ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोन्ही चक्रीवादळे निवळून गेली आहेत. उत्तर तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर, तसेच दक्षिण तमिळनाडूमध्ये ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत. उत्तरेकडून थंड वारे येऊ लागल्याने राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे.

गुरुवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी ३६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोलापूर, रत्नागिरी येथे तापमान ३६ अंशांच्या वर आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या कमाल तापमानात घट झाल्याची पाहायला मिळाली. तर किमान तापमानात घट होत असल्याने उत्तर महाराष्ट्रातील जळगावसह निफाड, छत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळ येथे पारा १४ अंशांच्या खाली आला आहे. पहाटे गारठा जाणवू लागला असून, राज्यात थंडी हळूहळू वाढत जाणार आहे.

गुरुवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.९ (१७.३), जळगाव ३५.२ (११), कोल्हापूर (२०.४), महाबळेश्‍वर २६.१ (१६.२), नाशिक ३२.१ (१५.३), निफाड ३२.२ (१३.६), सांगली ३३.६ (१८.७), सातारा ३२.३ (१६.८), सोलापूर ३६.१ (१७), सांताक्रूझ ३६.५ (२२.४), डहाणू ३५ (२२.५), रत्नागिरी ३६.४ (२३.१), छत्रपती संभाजीनगर ३३.२ (१५), नांदेड ३३.२ (१८), परभणी ३४.१ (१६.१), अकोला ३५ (१७), अमरावती ३२.६ (१६.३), बुलडाणा ३२.६ (१७.६), ब्रह्मपुरी ३३.७ (१८.१), चंद्रपूर ३२.६(१७), गडचिरोली ३१ (१७), गोंदिया ३१.६ (१५.८), नागपूर ३२.६ (१७), वर्धा ३२.५ (१६.८), वाशीम ३४ (१५.४) यवतमाळ ३४.२ (१४).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT