Winter Season Agrowon
हवामान

Maharashtra Weather: राज्यात थंडीचा कडाका कमीच; राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानात वाढ

Winter Weather Forecast: राज्यातील हवामान कोरडे होत असून थंडीमध्ये काहीशी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील थंडी कमीच दिसत आहे. राज्यातील अनेक भागात दुपारी उन्हाचा काहीसा चटकाही जाणवत आहे. उत्तर भारतातून कमी झालेले थंड वाऱ्याचे प्रवाह आणि राज्यातील अनेकदा जाणवणारे ढगाळ हवामान यामुळे किमान तापमान १० अंशाच्या पुढेच दिसत आहे. राज्यातील हवामान कोरडे होत असून थंडीमध्ये काहीशी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर भारतातही थंडीचा कडाका कमी झाला आहे. अनेक भागात किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली. आज राजस्थानातील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अनेक भागात किमान तापमान ५ अंशाच्या पुढेच होते.

दक्षिण भारतातील ईशान्य मोसमी वाऱ्यांचा हंगाम दोन दिवसांमध्ये समाप्त होण्याची शक्यता आहे. पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे ईशान्य अरबी समुद्रपासून दक्षिण राजस्थानपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. वायव्य भारतात १५० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत कायम आहेत. तसेच उत्तर भारतातही थंडीचा कडाका कमी-अधिक होत आहे.

जानेवारी महिन्यात थंडीचा कडाका तुलनेत कमीच राहीला आहे. डिसेंबरनंतर राज्यात गुलाबी थंडी जाणवलीच नाही. राज्यातील बहुतांशी भागात मागील काही दिवसांपासून किमान तापमानात वाढ झाली आहे. राज्यात पहाटे काहीसा गारठा जाणवत आहे. तर अनेक भागात धुक्याची चादरही दिसून येत आहे. तसेच दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. अशी परिस्थिती सध्या राज्यात पहायला मिळत आहे. राज्यातील काही भागात दुपारी उकाडाही जाणवत आहे.

आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्याच्या इतर भागात किमान तापमान ११ अंशांपेक्षा जास्तच होते. राज्यातील अनेक भागात तापमानात चढ उतार सुरुच आहेत. तर राज्यातील हवामान कोरडे होऊन किमान तापमानात घट होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT