Maharashtra Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather : उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी वाढली

North Maharashtra Weather Forecast : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढल्याने राज्यात गारठा पुन्हा वाढू लागला आहे. उत्तर महाराष्ट्रात पारा पुन्हा १० अंशांखाली घसरल्याने हुडहुडी वाढली आहे.

अमोल कुटे

Weather News : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढल्याने राज्यात गारठा पुन्हा वाढू लागला आहे. उत्तर महाराष्ट्रात पारा पुन्हा १० अंशांखाली घसरल्याने हुडहुडी वाढली आहे. आज (ता. १०) राज्यात किमान तापमानात आणखी घट होत थंडी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका टिकून आहे. सोमवारी (ता. ९) पंजाबच्या ‘अमृतसर’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्यात निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ६.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तसेच जळगाव, धुळे आणि नाशिक येथे तापमान १० अंशांच्या खाली घसरले आहे.

सोमवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३४ अंश तापमानाची नोंद झाली. यातच महाराष्ट्रात गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. आकाश अंशतः ढगाळ हवामान असले तरी स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असून, उन्हाचा चटका कमी-अधिक होत आहे. आज (ता. १०) किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होत थंडी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सोमवारी (ता. ९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.९ (१२), अहिल्यानगर - (१३.७), धुळे ३० (९.२), जळगाव ३०.५ (८.६), जेऊर - (१४.५), कोल्हापूर ३०.८ (१९.५), महाबळेश्वर २६.१ (१५), मालेगाव २७.८ (१६.६), नाशिक २९.५ (९.४), निफाड २६.२ (६.७), सांगली ३२.८ (१९.५), सातारा ३१.६ (१६.५), सोलापूर ३४.० (२२.२), सांताक्रूझ ३२.२ (१३.७), डहाणू २८.८ (१६),

रत्नागिरी ३२.२ (२१.१), छत्रपती संभाजीनगर ३१.२ (१४.६), धाराशिव - (१८.४), परभणी ३२.७ (१६.२), परभणी कृषी विद्यापीठ ३२.२ (११.२), अकोला ३३ (१६.५), अमरावती ३२.४ (१५.४), भंडारा २९.८ (१८), बुलडाणा २८.६ (१६.५), ब्रह्मपुरी ३०.२ (२०.६), चंद्रपूर ३०.८ (१५.०), गडचिरोली २७.२ (१५.४), गोंदिया २९.२ (२०), नागपूर ३०.३ (१६.०), वर्धा ३१.९ (१६.५), वाशीम ३२ (१९), यवतमाळ ३१.५ (-).

कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता वाढतेय

विषुववृत्तीय हिंद महासागर आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. ही प्रणाली उद्यापर्यंत (ता. ११) तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

१० अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :

निफाड ६.७, जळगाव ८.६, धुळे ९.२, नाशिक ९.४.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT