Heatwave Agrowon
हवामान

Maharashtra Heatwave Alert: राज्यात थंडी-उन्हाचा तफावत! कोकणात उष्णतेचा इशारा

Maharashtra Weather: राज्यात कमाल आणि किमान तापमानात मोठी तफावत पाहायला मिळत आहे. कोकणात उष्णतेचा जोर वाढल्याने हवामान विभागाने 'येलो अलर्ट' जारी केला आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात मोठी तफावत पाहायला मिळत आहे. गुरुवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुळदे (जि. सिंधुदुर्ग) यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर निफाड येथे राज्याचे नीचांकी ४.२ अंश तापमान नोंदले गेले. आज (ता. ७) कोकणात उष्ण व दमट हवामानामुळे सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे, तर राज्याच्या कमाल आणि तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरुवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर आणि सांताक्रूझ येथे ३८.२ अंशांवर, तर सांगली, वाशीम, रत्नागिरी आणि कोल्हापूर येथे तापमान ३७ अंशांच्या पुढे होते. पुणे, जेऊर, सातारा, धाराशिव, परभणी, चंद्रपूर येथे तापमानाचा पारा ३६ अंशांच्या पारा पोहोचला होता. कमाल तापमानातील वाढ कायम असल्याने दुपारच्या वेळी उकाड्यात वाढ टिकून होती.

दरम्यान उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात अचानक मोठी घट झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात पारा ४.२ अंशांपर्यंत घसरला. परभणी येथील कृषी विद्यापीठ आणि धुळे येथील कृषी महाविद्यालयात किमान तापमान ७.५ अंशांच्या खाली होते. जळगाव, नाशिक, अहिल्यानगर येथेही तापमान १० अंशांपर्यंत घसरल्याने कडाक्याची थंडी अनुभवायला मिळाली. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात तब्बल २० ते २९ अंशांपर्यंत तफावत दिसून आली.

आज (ता. ७) कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हवामान सरासरीपेक्षा उष्ण व दमट राहणार असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्याच्या कमाल तापमानातील वाढ कायम राहणार आहे. रात्रीच्या किमान तापमानात देखील वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गुरुवारी (ता. ६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---कमाल---किमान

पुणे---३६.०---१३.४

अहिल्यानगर---निरंक---१०.४

धुळे---३१.५---७.५

जळगाव---३३.०---१०.०

जेऊर---३६.५---१५.०

कोल्हापूर---३७.१---२०.८

महाबळेश्‍वर---३२.९---१६.८

मालेगाव---३२.२---११.४

नाशिक---३३.१---१०.०

निफाड---३१.३---४.२

सांगली---३७.९---२०.०

सातारा---३६.२---१७.६

सोलापूर---३८.२---१८.९

सांताक्रूझ---३८.२---१८.९

डहाणू---३५.५---१८.०

रत्नागिरी---३७.५---२०.५

छत्रपती संभाजीनगर---३४.४---१२.४

धाराशिव---३६.१---१८.०

परभणी---३६.३---१४.०

परभणी (कृषी)---३४.५---७.२

अकोला---३५.७---१३.३

अमरावती---३४.२---१३.७

भंडारा---३२.४---१५.०

बुलडाणा---३१.०---१५.२

ब्रह्मपुरी---३४.३---१४.०

चंद्रपूर---३६.२---निरंक

गडचिरोली---३३.२---१५.६

गोंदिया---३०.४---११.४

नागपूर---३४.०---१३.८

वर्धा---३४.५---१५.०

वाशीम---३७.६---निरंक

यवतमाळ---३४.०---१२.०

उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT