Cloudy Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update : ढगाळ हवामानासह किमान तापमानात वाढ शक्य

Cloudy Weather : उत्तरेकडील शीत लहरींचा अभाव, सातत्याने होणारे ढगाळ हवामान यामुळे यंदा थंडीचा कडाका कमी आहे. यातच उन्हाचा चटका आणि उकाडा वाढल्याचे दिसून येत आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील शीत लहरींचा अभाव, सातत्याने होणारे ढगाळ हवामान यामुळे यंदा थंडीचा कडाका कमी आहे. यातच उन्हाचा चटका आणि उकाडा वाढल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांत राज्यात ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता असल्याने, किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पश्चिम राजस्थानात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर, तसेच दक्षिण केरळमध्ये ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत. वायव्य भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १३० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत. शुक्रवारी (ता. ३१) पूर्व उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात गारठा कमी-अधिक होत असला दाट धुके आणि दव पडल्याचे चित्र कायम आहे. शुक्रवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान १० ते २० अंशांच्या दरम्यान आहे.

उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमान ३२ ते ३६ अंशांदरम्यान स्थिरावले असून, उकाड्यामुळे घामटा निघत आहे. शुक्रवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांत वाशीम येथे ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुणे, जेऊर, सोलापूर परभणी, अकोला आणि ब्रह्मपुरी येथे पारा ३५ अंशांपार आहे. तसेच अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३२ अंशांच्या वर गेला आहे.

आजपासून (ता. १) राज्यात ढगाळ हवामान होण्याची शक्यता आहे. तसेच रविवारपासून (ता. २) तुरळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान होणार असून, किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शुक्रवारी (ता. ३१) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३५.२---१५.८

अहिल्यानगर---निरंक---१३.५

धुळे---३२.०---१०.०

जळगाव---३३.३---१४.१

जेऊर---३५.०---१४.५

कोल्हापूर---३२.७---१८.२

महाबळेश्वर---२९.०---१६.२

मालेगाव---३३.३---१२.५

नाशिक---३३.३---१२.५

निफाड---३०.४---१०.३

सांगली---३३.९---१७.४

सातारा---३४.२---१६.५

सोलापूर---३५.०---१८.४

सांताक्रूझ---३२.४---१७.६

डहाणू---३०.७---१७.०

रत्नागिरी---३४.२---१९.०

छत्रपती संभाजीनगर---३३.४---१७.०

धाराशिव---३२.५---१४.०

परभणी---३५.०---१८.३

परभणी (कृषी)---३४.२---११.८

अकोला---३५.३---१७.४

अमरावती---३४.२---१५.८

भंडारा---३३.०---२०.०

बुलडाणा---३४.४---१७.४

ब्रह्मपुरी---३५.०---१८.४

चंद्रपूर---३३.८---निरंक

गडचिरोली---३२.४---१६.४

गोंदिया---३२.४---२०.८

नागपूर---३४.२---१८.६

वर्धा---३४.५---१८.२

वाशीम---३६.२---२०.०

यवतमाळ---३४.४---२०.५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

Digital Fertilizer Distribution: जिल्ह्यात आजपासून मोबाइल ॲपद्वारे खत वितरण

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT