Winter Season Agrowon
हवामान

Winter Weather : ढगाळ हवामानासह गारठा कमी होण्याची शक्यता

Winter Climate Update : तापमानात हलका बदल होत असून, ढगाळ हवामानामुळे गारठा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येणाऱ्या काही दिवसांत हवामानात स्थिरता येण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना गारठ्याचा सामना कमी होईल.

अमोल कुटे

Pune News : किमान तापमानात घट झाल्याने राज्यात गारठा पुन्हा वाढला आहे. मात्र आजपासून (ता. २१) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामान होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे किमान तापमानात पुन्हा काही अंशी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वायव्य भारतात १४० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत कायम आहेत. पश्चिमी चक्रवातांच्या तीव्रतेनुसार थंडी सातत्याने कमी-अधिक होत आहे. सोमवारी (ता. २०) मध्य प्रदेशच्या मंडला येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्याच्या अनेक भागात थंडी-कमी अधिक होत असून, धुक्याची दुलई पाहायला मिळत आहे. सध्या किमान तापमानाचा पारा घसरल्याने उत्तर महाराष्ट्रात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तापमान १० अंशांच्या खाली घसरला आहे. यातच दिवसभर वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे उन्हाचा चटका कमी झाला आहे.

सोमवारी (ता. २०) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर निफाड आणि परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात तापमान १० अंशांच्या खाली आले होते.

कोकणात उन्हाचा चटका कायम असल्याने सोमवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत रत्नागिरी येथे ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आजपासून (ता. २१) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुन्हा ढगाळ हवामान होण्याची शक्यता असल्याने किमान तापमानात पुन्हा काहीशी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सोमवारी (ता. २०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---कमाल---किमान

पुणे---३०.२---१२.८

अहिल्यानगर---३०.८---१०.६

धुळे---३०.०---८.०

जळगाव---३०.४---१२.८

जेऊर---३२.५---१२.५

कोल्हापूर---२९.६---१७.८

महाबळेश्वर---२६.६---१४.५

मालेगाव---२६.६---१४.५

नाशिक---३०.२---१२.८

निफाड---३०.०---९.२

सांगली---३१.५---१६.५

सातारा---३१.५---१४.४

सोलापूर---३३.९---१७.४

सांताक्रूझ---३४.३---१७.१

डहाणू---३०.१---१७.९

रत्नागिरी---३५.०---२०.२

छत्रपती संभाजीनगर---३०.८---१३.०

धाराशिव---निरंक---१३.१

परभणी---३०.४---१२.६

परभणी (कृषी)---२९.६---८.५

अकोला---३२.५---१३.५

अमरावती---३२.५---१३.५

भंडारा---३०.०---१३.०

बुलडाणा---३०.४---१४.६

ब्रह्मपुरी---३२.२---१२.३

चंद्रपूर---३०.२---निरंक

गडचिरोली---३०.०---१३.०

गोंदिया---२९.४---११.६

नागपूर---२९.८---११.२

वर्धा---३०.८---१२.९

वाशीम---२९.८---१४.४

यवतमाळ---३०.५---१२.८

१० अंशापेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :

धुळे ८, परभणी (कृषी) ८.५, निफाड ९.२.=

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lemon Mosambi Procurement: ‘नाफेड’तर्फे लिंबू, मोसंबी खरेदी करावी: शेतकरी सहकारी संघ

Agriculture Economy: शेतकऱ्यांच्या सहकारातून कृषी अर्थव्यवस्थेला बळ : डॉ. हरमकर

Agriculture Officers Training: अधिकारी कर्मचाऱ्यांनी जाणून घेतले उपयोगी तंत्रज्ञान

Fertilizers Buffer Stock: खत कंपन्यांना बफर स्टॉक ठेवणे बंधनकारक: जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

Indigenous Cow Conservation: स्वावलंबी शेतीसाठी देशी गाईंचे संवर्धन व्हावे

SCROLL FOR NEXT