Winter agrowon
हवामान

Cloudy Weather : ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ

Temperature Rise Update : आज (ता. १६) राज्यात आकाश ढगाळ राहून विदर्भात हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात होत असलेल्या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. परिणामी, गारठा कमी होत उकाडा वाढल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. आज (ता. १६) राज्यात आकाश ढगाळ राहून विदर्भात हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

आग्नेय अरबी समुद्रामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. उत्तर भारतात १५५ नॉट्स वेगाने पश्‍चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत. उत्तरेकडील राज्यात दाट धुके आणि कडाक्याची थंडी अनुभवायला मिळत आहे. बुधवारी (ता. १५) पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी २.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात गेले काही दिवस सकाळी उशिरापर्यंत धुके पाहायला मिळत आहे. दिवसभर असलेल्या अंशतः ढगाळ हवामानामुळे झाल्याने थंडी पुन्हा गायब होत उकाड्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बुधवारी (ता. १५) धुळे येथील कृषी महाविद्यालयात ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमान १३ अंशांच्या पुढे गेले आहे.

बुधवारी (ता. १५) सकाळपर्यंच्या २४ तासांत सांताक्रूझ येथे ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १६) राज्यात ढगाळ हवामान राहण्याचा तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. किमान तापमानात १ ते २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी (ता. १५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---कमाल---किमान

पुणे---३०.८---१६.१

अहिल्यानगर---२९.९---१५.४

धुळे---२७.०---९.२

जळगाव---२६.५---१८.१

जेऊर---३३.०---१४.५

कोल्हापूर---३०.१---१९.६

महाबळेश्‍वर---२६.१---१५

मालेगाव---२५.४---१६.४

नाशिक---२८.८---१७.६

निफाड---२७.४---१५.७

सांगली---३०.६---२०.३

सातारा---३०.७---१७

सोलापूर---३३.८---१९.५

सांताक्रूझ---३५.४---२०.३

डहाणू---३१---१८.६

रत्नागिरी---३३.५---२२.३

छत्रपती संभाजीनगर---२९.४---१७.५

धाराशिव---२९.६---१६

परभणी---२८.५---१५.१

परभणी (कृषी)---२९.९---१६.३

अकोला---२८.९---१८.४

अमरावती---२८.८---१५.३

भंडारा---२८.२---१३

बुलडाणा---२८.५---१७

ब्रह्मपुरी---३१.३---१५.१

चंद्रपूर---२९.८---निरंक

गडचिरोली---२९.४---१४

गोंदिया---२७.९---१५.२

नागपूर---२७.४---१६.५

वर्धा---२७.५---१५.४

वाशीम---२९---१९

यवतमाळ---२८.०---१५.७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT