Cloudy Weather Agrowon
हवामान

Maharashtra Winter Weather: राज्यात आजही ढगाळ हवामानाचा अंदाज; राज्यातील किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमीच

Maharashtra Rain Forecast : उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह किरकोळ पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात ढगाळ हवामान असल्याने किमान तापमान वाढ झाली आहे. यामुळे अनेक भागात आजही थंडी कमीच होती. राज्यातील थंडी कमीच राहण्याचा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह किरकोळ पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.  

उत्तर भारतता वाढलेली थंडी काही प्रमाणात टिकून आहे. उत्तर भारतातील अनेक ठिकाणी किमान तापमानात घट झालेली आहे. उत्तरेकडील राज्यात दाट धुके आणि कडाक्याची थंडी अनुभवायला मिळत आहे.

आज राजस्थानमधील नागापूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर आग्नेय अरबी समुद्रामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. उत्तर भारतात पश्‍चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत. 

राज्यात मात्र ढगाळ वातावरणाचा परिणाम दिसून येत आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊसदेखील झाला. नगर आणि पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी किरकोळ स्वरुपाच्या सरी झाल्या.

राज्यात गेले काही दिवस धुके पाहायला मिळत आहे. तर दिवसा ढगाळ वातावरण राहत आहे. कार कारणाने थंडी कमीच आहे. आजही उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात किरकोळ पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fardad Kapus: फरदड कापसाचे पीक का घेऊ नये?

Fish Rate: बाजारात ताज्या मासळीचे दर तिप्पट

Sugarcane Bill: निळकंठेश्वर कारखान्यातर्फे चोवीस कोटी ३५ लाखांचे ऊसबिले अदा

PA Retirement Farewell:...अन् जिल्हाधिकारी झाले बॉडीगार्ड !

Sand Mining: नदीपात्रात वाहने उतरविल्याने वाळू उपशाला स्थगिती

SCROLL FOR NEXT