Winter Weather Agrowon
हवामान

Weather Update: राज्यात ढगाळ वातावरणाची शक्यता; राज्यातील थंडीचा कडाका कमीच राहण्याची शक्यता

Maharashtra Winter Forecast: उत्तर भारतातील बहुतांशी ठिकाणी आज थंडी कमी झाली होती. उत्तर भारतातून थंड वाऱ्यांचे प्रवाह खंडीत झाले आहेत, तसेच राज्यात ढगाळ आणि कोरड्या हवामानामुळे थंडी कमीच आहे.

Anil Jadhao 

Pune News: उत्तर भारतातील बहुतांशी ठिकाणी आज थंडी कमी झाली होती. उत्तर भारतातून थंड वाऱ्यांचे प्रवाह खंडीत झाले आहेत, तसेच राज्यात ढगाळ आणि कोरड्या हवामानामुळे थंडी कमीच आहे.

राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढत आहे. राज्यात आकाश अंशतः ढगाळ होण्याची व किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. तसेच फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर भारतातील अनेक भागात आज थंडी कमी झाली होती. आज उत्तर प्रदेशातील फुरसगंज येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. एकामागोमाग येणाऱ्या पश्चिमी चक्रवातांबरोबरच वायव्य भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १४५ नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत. उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी-अधिक होत आहे.

राज्यात थंडीतील चढ उतार कायम आहेत. राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानात वाढ झालेली आहे. आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

तर राज्यातील इतर भागातील किमान तापमान १२ अंशाच्या पुढे होते. राज्यात आकाश अंशतः ढगाळ होण्याची व किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. तसेच फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Sales : फेब्रुवारी महिन्यात ट्रॅक्टरच्या विक्रीत ३४ टक्के वाढ; खरेदीला पसंती का?

Farmer Justice: अखेर अपघातग्रस्त ट्रॅक्टर शेतकरी कुटुंबाला मिळाला परत!

Agriculture Success Story: बचत गट ते शेतकरी उत्पादक कंपनी

Cotton Bag Scam: कापूस पिशव्यांच्या खरेदीत गैरव्यवहार, चौकशी अहवाल कृषी आयुक्तालयास सादर

Farm Pond: शेततळ्यांसाठीचे १७ हजारांवर अर्ज रद्द

SCROLL FOR NEXT