Cloudy Weather Agrowon
हवामान

Maharashtra Cloudy Weather : ढगाळ हवामानामुळे गारठा कमी

Maharashtra Weather Forecast : पावसाला पोषक हवामान होत ढगाळ हवामान झाल्याने राज्यात गारठा कमी झाला आहे. तापमानात वाढ होत अनेक ठिकाणी पारा १० अंशांच्या वर गेला आहे.

अमोल कुटे

Pune News : पावसाला पोषक हवामान होत ढगाळ हवामान झाल्याने राज्यात गारठा कमी झाला आहे. तापमानात वाढ होत अनेक ठिकाणी पारा १० अंशांच्या वर गेला आहे. आज (ता. १२) उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून ईशान्य अरबी समुद्रामध्ये हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर भारतात थंडी कमी-अधिक होत असून, दाट धुक्याचे साम्राज्य दिसून येत आहे. शनिवारी (ता. ११) बिहारच्या देहरीमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दोन दिवसांपासून राज्याच्या बऱ्याच भागात पहाटे धुके पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी ढगाळ हवामान झाल्याने गारठा कमी झाला आहे. शनिवारी (ता. ११) धुळे आणि नगर येथे ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

शनिवारी (ता. ११) सकाळपर्यंच्या २४ तासांत रत्नागिरी येथे ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १२) उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी (ता. ११) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---२८.८---१४.३

अहिल्यानगर---२७.८---९.५

धुळे---२९---९.५

जळगाव---२७.८---१३.५

जेऊर---२९.५---१३

कोल्हापूर---२८.३---१८.७

महाबळेश्‍वर---२५.५---१४.४

मालेगाव---२५.८---११.४

नाशिक---२९.८---१३.३

निफाड---२७.५---१०.१

सांगली---२९.१---१९.१

सातारा---२८.९---१५.६

सोलापूर---३०.५---१९.४

सांताक्रूझ---३२.७---१८.४

डहाणू---३३.२---१८

रत्नागिरी---३३.६---२०.४

छत्रपती संभाजीनगर---२७.४---१४

बीड---२९.३---१०.५

धाराशिव---२८.१---१४.४

नांदेड---निरंक---१४.३

परभणी---२७.७---१४.९

परभणी (कृषी)---२७.३---१२

अकोला---३०.१---१४.६

अमरावती---२९.४---१४.७

भंडारा---२८.६---१२.४

बुलडाणा---२८.४---१५

ब्रह्मपुरी---३२.६---११.९

चंद्रपूर---२८.६---निरंक

गडचिरोली---२८---१२

गोंदिया---२८.६---११.३

नागपूर---२८.६---११.५

वर्धा---२९---१२.६

वाशीम---२८.४---१४

यवतमाळ---२९.२---१५.७

१० अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :

अहिल्यानगर ९.५, धुळे ९.५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT