Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather: ढगाळ हवामानाचा काही ठिकाणी अंदाज; राज्यातील थंडीत काही प्रमाणात चढ उतार सुरुच

Winter Weather Update: हवामान विभागाने राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणाचा अंदाज दिला. त्यामुळे तापमानात काहीसे चढ उतारही राहू शकतात, असेही म्हटले आहे.

Anil Jadhao 

Pune News : उत्तर भारत आणि राज्यातही आज काही भागात थंडी वाढली होती. राज्यात किमान तापमानात घट झाल्याने गारठा कायम आहे. असे असतानाही राज्यातील थंडीचे प्रमाण सरासरीपेक्षा कमीच आहे. हवामान विभागाने राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणाचा अंदाज दिला. त्यामुळे तापमानात काहीसे चढ उतारही राहू शकतात, असेही म्हटले आहे.

उत्तर भारतात थंडीच्या कडाक्यातही चढ उतार सुरु आहेत. एकामागोमाग येणाऱ्या पश्‍चिमी चक्रवातांमुळे थंडी सातत्याने कमी-अधिक होत आहे. आज पंजाबमधील आदमपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

तर राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वायव्य भारतात १५० नॉट्स वेगाने पश्‍चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत कायम आहेत. या परिस्थितीचा राज्यातील थंडीवरही परिणाम होत आहे.

राज्यातील किमान तापमानतही चढ उतार कायम आहेत. काही भागात थंडीचे प्रमाण जास्त दिसत आहे. विशेष करून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात थंडी तुलनेत अधिक जाणवत आहे. तर काही भागात धुक्याची दुलई पाहायला मिळत आहे.

किमान तापमानाचा पारा घसरल्याने उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तापमान १० अंशांच्या खाली घसरले आहे. आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर धुळे येथे ९.५ अंशाची नोंद झाली.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ हवामानामुळे या भागातील किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामन विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

India Economy: देशात सध्या अस्वस्थता : शरद पवार

SCROLL FOR NEXT