Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather: तापमानातील चढ उतार सुरुच; राज्यातील अनेक भागात सकाळी वातावरणातील गारवा वाढला

Weather Forecast: महाराष्ट्रात तापमानाचा लहरीपणा सुरू असून सकाळी गारवा वाढत असताना, दुपारी उन्हाचा तडाखा बसतो आहे. निफाड येथे ८ अंश सेल्सिअस तर सोलापूरमध्ये तब्बल ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने तापमानातील चढ-उतार पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Anil Jadhao 

Pune News: तापमानातील चढ उतार कायम आहेत. सकाळी तापमानात घट होत आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून राज्यात सकाळी गारवा वाढला. तर दुपारी उन्हाचा चटका चांगलाच वाढलेला आहे.

आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील सर्वात कमी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सोलापूर येथे सर्वाधिक ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील तापमानत चढ उतार कायम राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

उत्तर भारतातील तापमानातही चढ उतार सुरुच आहेत. आज पंजाबमधील रोपार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मध्य प्रदेशातील कुर्नूल येथे देशातील सर्वाधिक ३८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वायव्य भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १२० नॉट्स वेगाने पश्‍चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह वाहत आहेत. याचा उत्तर भारतातील तापमानावर परिणाम होत आहे. 

राज्यात निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बुहतांश ठिकाणी किमान तापमान १० ते २० अंशांच्या दरम्यान होते. राज्याच्या कमाल तापमानात वाढ झाली.

सोलापूरसह, सांगली, जेऊर, परभणी, सांगली येथे ३६ अंश व त्यापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. तर अनेक ठिकाणी तापमान ३५ अंशाच्या पुढे गेले आहे. राज्यातील तापमानात चढ उतार कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

Paddy Sowing: भात पेरणीची घाई करू नका

Palghar Rain Update: पावसाच्या प्रतीक्षेला अखेर विराम

Tur MSP Procurement: शेतकऱ्यांकडून तुरीची हमीभावापेक्षा कमी दरात खुल्या बाजारात विक्री?; पणनमंत्र्यांकडून महत्त्वाचा खुलासा

SCROLL FOR NEXT