Monsoon  Agrowon
हवामान

Monsoon Rain : पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज

Weather Update : विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. पण जोरदार पाऊस दिसत नाही. हवामान विभागाने राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज दिला. विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज आहे. 

हवामान विभागाने आजपासून पुढील २ दिवस राज्याच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला. आज कोकणातील रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार ते जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला.

तर संपूर्ण विदर्भ, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नगर, कोल्हापूर कोकण आणि सिंधुदूर्ग आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर इतर भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

उद्या संपूर्ण विदर्भ, मध्यम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पणे, सोलापूर, धुळे आणि जळगाव जिल्हा तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, नांदेड आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही देण्यात आला. 

सोमवारी संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि जळगाव तसेच कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT