Weather Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता!

Weather Alert: राज्यात उन्हाच्या कडाक्याच्या पार्श्वभूमीवर वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट, तर काहींसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्यात उन्हाच्या चटका तापदायक ठरत असताना, राज्यात वादळी पावसाचे ढग घोंघावत आहेत. आज (ता. २) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीपासून मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण छत्तीसगडपर्यंत, तसेच कर्नाटक, तमिळनाडू ते कोमोरीनपर्यंत हवेचे कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहेत. या प्रणालीमुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होत असल्याने राज्यात वादळी पाऊस आणि गारपिटीला पोषक वातावरण तयार झाले आहे.

मंगळवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांत ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर येथे ४२ अंश, तर अकोला, गडचिरोली येथे ४१ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. सोलापूर, परभणी, अमरावती, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ येथे ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. सोमवारी (ता. ३१) सायंकाळनंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली. धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

आज (ता. २) मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, मराठवाड्यातील जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड तसेच विदर्भातील अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यांत वादळी पाऊस गारपिटीची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात वादळी पावसाच्या अंदाजामुळे दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.

मंगळवारी (ता. १) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३९.२---२२.६

अहिल्यानगर---३६.०---२२.४

धुळे---३९.०---१७.०

जळगाव---३९.६---निरंक

जेऊर---३९.५---२३.०

कोल्हापूर---३७.४---२४.६

महाबळेश्वर---३१.४---१७.८

मालेगाव---३८.२---२०.८

नाशिक---३८.६---२४.२

निफाड---३९.०---२०.३

सांगली---३७.०---२४.५

सातारा---३७.७---२४.५

सोलापूर---४०.८---२६.०

सांताक्रूझ---३३.२---२५.३

डहाणू---३३.१---२२.५

रत्नागिरी---३२.५---२६.२

छत्रपती संभाजीनगर---३९.४---२५.६

धाराशिव---३९.०---२४.२

परभणी---४०.५---२५.३

परभणी (कृषी)---४०.०---२२.७

अकोला---४१.४---२७.८

अमरावती---४०.८---२७.३

भंडारा---३९.०---२४.०

बुलडाणा---३८.०---२६.४

ब्रह्मपुरी---४२.२---२४.४

चंद्रपूर---४२.०---निरंक

गडचिरोली---४१.०---२२.०

गोंदिया---३९.२---२२.२

नागपूर---३९.९---२४.२

वर्धा---४०.५---२६.२

वाशीम---४०.२---निरंक

यवतमाळ---४०.२---२४.६

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---२२.०---४२.२

मराठवाडा---२२.७---४०.५

पश्‍चिम महाराष्ट्र---१७.८---४०.८

उत्तर महाराष्ट्र---२०.३---३९.६

कोकण---२२.५---३३.२

४१ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

ब्रह्मपुरी ४२.२, चंद्रपूर ४२, अकोला ४१.४, गडचिरोली ४१.

वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती, चंद्रपूर.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, जळगाव, सांगली, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT