Rain Forecast Agrowon
हवामान

Rain Forecast : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Weather Update : राज्यात सुरू असलेल्या मॉन्सूनोत्तर पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. आज (ता. २९) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात सुरू असलेल्या मॉन्सूनोत्तर पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. आज (ता. २९) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

आग्नेय राजस्थान व पश्‍चिम मध्य प्रदेश परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर अरबी समुद्रापासून मध्य प्रदेशपर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. नैर्ऋत्य अरबी समुद्रात, तसेच दक्षिण श्रीलंकेजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राज्यात पावसाचा जोर ओसरला असला, तरी विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडत आहेत.

आज (ता. २९) मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत विजांसह पावसाचा ‘येलो अलर्ट’ कायम आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान, विजांसह पावसाची शक्यता आहे.

पावसाळी वातावरणामुळे कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार झाल्याचे पाहायला मिळत आहेत. सोमवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३४.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील नीचांकी १५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

मंगळवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३०.८ (१८.८), धुळे २२.५ (१५.२), जळगाव २२.६ (१७.४), कोल्हापूर २९.७ (२२), महाबळेश्‍वर २३.९ (१६.५), नाशिक २२.९ (१९), निफाड २७.८ (१६.६), सांगली ३०.४ (२२.१), सातारा २९.५ (२१.१), सोलापूर ३३.४ (२२.६), सांताक्रूझ ३०.३ (२३.५), डहाणू ३०.४ (२३.५), रत्नागिरी ३४.१ (२३.९),

छत्रपती संभाजीनगर २१.२ (१९), नांदेड २७.८ (१८.२), परभणी २४.६ (२०), अकोला २१ (१७.४), अमरावती २१ (१५.३), बुलडाणा ३०.४ (१६.६), ब्रह्मपुरी २७.१ (१७.८), चंद्रपूर २५.६(१५), गडचिरोली २४ (१५.४), गोंदिया २५.२ (१५.९), नागपूर २४.२ (१६.२), वर्धा २३.८ (१७.६), वाशीम २३.४ (१६.२), यवतमाळ २३.५ (१६.५).

कमी दाब क्षेत्र होतेय तीव्र

दक्षिण अंदमान समुद्रात असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे सोमवारी (ता. २७) कमी दाबाचे क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असून, उद्यापर्यंत (ता. ३०) तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर होणार आहे. वायव्येकडे सरकताना शनिवारपर्यंत (ता. २) उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lek Ladki Yojana: ‘लेक लाडकी’च्या १२५०० लाभार्थी

Farmer Innovation: शेतकऱ्यांच्या कल्पकतेला शाबासकीची थाप

War Impact on Agri: युद्धामुळे खतांच्या किंमती वाढणार?

Ahilyanagar ZP Budget: अहिल्यानगर झेडपीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी चार कोटी

Village Mapping: गावाचे मॅपिंग नसल्याने शेतकऱ्यांची वाढली चिंता

SCROLL FOR NEXT