Rain Alert Agrowon
हवामान

Maharashtra Rain: विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

Rain Update: आज (ता. १२) पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह ऊन - सावल्यांच्या खेळात हलक्या पावसाची शक्यता कायम आहे.

अमोल कुटे

Pune News: पावसाची उघडीप असल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. ऐन पावसाळ्यात उन्हाच्या झळा वाढल्याने दुपारी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. आज (ता. १२) पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह ऊन - सावल्यांच्या खेळात हलक्या पावसाची शक्यता कायम आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा अमृतसर पासून, पटियाला, बरेली, लखनौ, गोरखपूर, पटणा ते अरुणाचल प्रदेशपर्यंत सक्रिय आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा परिसरावर, कच्छ आणि परिसरावर, तसेच कर्नाटक आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत. बंगालच्या उपसागरात उद्यापर्यंत (ता. १३) हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी पावसाची उघडीप असल्याने उन्हाच्या झळा, घामाच्या धारा कायम आहेत. सोमवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाच्या सरी पडल्या. पावसाची दडी असलेल्या भागात कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका, उकाडा त्रासदायक ठरत आहे. विदर्भातील चंद्रपूर ‎येथे राज्यातील उच्चांकी ३४.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

आज (ता. १२) पूर्व विदर्भातील यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत विजांसह पावसाच्या सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडिपीसह उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सोमवारी (ता. ११) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान
‎पुणे---३१.२---२२.४
अहिल्यानगर---२९.८---२०.६
‎‎धुळे---३३.०---२०.५
जळगाव---३४.०---२३.२
जेऊर---३२.०---१९.०
‎‎कोल्हापूर---निरंक---२१.८
‎महाबळेश्वर---२०.५---१६.७
मालेगाव---३०.८---२१.६

‎‎नाशिक---२९.१---२१.३
‎निफाड---३०.७---२१.०
‎सांगली---२८.७---२१.८
‎सातारा---२९.८---२१.८
‎सोलापूर---३१.०---२२.६
‎सांताक्रूझ---३१.३---२५.५
डहाणू---३१.०---२४.०
‎रत्नागिरी---२८.०---२४.३
‎छत्रपती संभाजीनगर---३१.८---२१.८
‎धाराशिव---२८.५---२०.६

परभणी---३०.९---२३.५
परभणी (कृषी)---३१.१---२२.७
‎‎अकोला---३४.०---२४.७
अमरावती---३२.६---२२.५
भंडारा---३२.६---२४.०
बुलढाणा---३०.२---२२.४
‎ब्रह्मपुरी---३३.८---२५.४

चंद्रपूर---३४.६---२५.२
‎गडचिरोली---३३.०---२३.८
‎गोंदिया---३१.६---२४.५
‎नागपूर---३३.९---२४.६
‎वर्धा---३४.२---२५.४
‎वाशीम---२८.४---२३.६
‎यवतमाळ---३२.२---२३.६

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

विजांसह पावसाचा अंदाज :
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women In Agriculture: शेतकरी महिलांसाठी आगामी अधिवेशनात विधेयक

Wheat Harvest: पारगाव शिवारात गहू मळणीची लगबग

AI In Agriculture: ‘एआय’ अंमलबजावणीचा कार्यभार उपसचिवांकडे

Sugar Industry: साखर कारखान्यांवर डिजिटल वजन काटे बसवा

Agriculture Subsidy: साडेपाचशे कोटी अनुदान वाटपासाठी हालचाली

SCROLL FOR NEXT