Thunderstrorm Agrowon
हवामान

Maharashtra Weather: राज्यात विजांसह पावसाची शक्यता

Weather Forecast: राज्यात तापमानाचा पारा चाळिशीपार गेल्याने वाढलेले तापमान आणि उकाडा हैराण करत आहे. यातच पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. ३०) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्यात तापमानाचा पारा चाळिशीपार गेल्याने वाढलेले तापमान आणि उकाडा हैराण करत आहे. यातच पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. ३०) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर राज्याच्या तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ओडिशापासून छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे पावसाला पोषक हवामान असल्याने राज्याच्या अनेक भागांत ढगाळ हवामान होत आहे. दरम्यान, शनिवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अकोला आणि गडचिरोली येथे ४१ अंशांपेक्षा तापमान नोंदले गेले.

जेऊर, सोलापूर, अमरावती, भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ येथे तापमान ४० अंशांच्या वर होते. ढगाळ हवामानामुळे उकाड्यात चांगलीच वाढ झाली असून, दुपारच्या वेळी जीव कासावीस होत आहे. आज (ता. ३०) कमाल तापमानातील वाढ, उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शनिवारी (ता. २९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३८.४---२०.३

अहिल्यानगर---३६.८---२१.५

धुळे---३६.५---१६.८

जळगाव---३७.८---२०.०

जेऊर---४०.०---२२.०

कोल्हापूर---३८.१---२५.८

महाबळेश्‍वर---३२.५---१९.८

मालेगाव---३६.४---१८.४

नाशिक---३६.४---१८.४

निफाड---३७.२---१५.२

सांगली---३७.६---२५.२

सातारा---३८.४---२३.०

सोलापूर---४०.९---२७.१

सांताक्रूझ---३३.६---२१.१

डहाणू---३२.०---२३.६

रत्नागिरी---३२.६---२३.७

छत्रपती संभाजीनगर---३७.७---२४.६

धाराशिव---३८.०---२३.२

परभणी---३९.८---२३.७

परभणी (कृषी)---३८.६---२०.१

अकोला---४१.०---२३.०

अमरावती---४०.८---२४.१

भंडारा---४०.०---२३.०

बुलडाणा---३५.५---२३.०

ब्रह्मपुरी---४२.३---२३.८

चंद्रपूर---४२.०---निरंक

गडचिरोली---४१.०---२०.४

गोंदिया---४०.२---२२.२

नागपूर---४१.८---२२.८

वर्धा---४१.९---२४.४

वाशीम---३९.६---निरंक

यवतमाळ---४०.४---२३.४

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---२०.४---४२.३

मराठवाडा---२०.१---३९.८

पश्‍चिम महाराष्ट्र---१९.८---४०.९

उत्तर महाराष्ट्र---१५.२---३७.२

कोकण---२१.१---३३.६

विजांसह पावसाचा अंदाज :

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव.

४१ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

ब्रह्मपुरी ४२.३, चंद्रपूर ४२, वर्धा ४१.९, नागपूर ४१.८, अकोला ४१, गडचिरोली ४१.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT