Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert: पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Rain Update: राज्यातील मॉन्सूनची वाटचाल सध्या स्थिर असून पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. मात्र पूर्व विदर्भात वीजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Anil Jadhao 

Pune News: मॉन्सूनची वाटचाल थांबल्यानंतर राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. उन्हाचा चटका आणि उकाड्यातही वाढ झाली आहे. आज (ता. ३) विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडिपीसह तापमान चढ-उतार शक्य आहे.

‎मॉन्सून कमजोर होताच पावसाने उघडीप दिली असली तरी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडत आहे. राज्यात अंशतः ढगाळ हवामान आहे. मात्र उन्हाचा चटका आणि उकाडा चांगलीच वाढ झाली आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमान ३९ अंशांच्या पार गेले आहे. चंद्रपूर येथे ३९.८ अंश तापमानाची नोंद झाली.

आज (ता. ३) कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार सरींची शक्यता आहे. तर विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनची वाटचाल ‘जैसे थे’

नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) यंदा विक्रमी वेगाने वाटचाल करत केरळसह, महाराष्ट्रात सर्वसाधारण वेळेआधी धडक दिली. मात्र पाच दिवसांपासून अरबी समुद्रातून प्रवाह कमी झाल्याने मॉन्सूनची चाल थांबली आहे. मुंबई, अहिल्यानगर, अदिलाबाद, पुरी आणि पूर्व भारतातील बालूरघाट पर्यंतची मॉन्सूनची सीमा ‘जैसे थे’ आहे.

सोमवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (सौजन्य : हवामान विभाग) :

कोकण : कर्जत ४०, दापोली, वाकवली, माथेरान, चिपळूण प्रत्येकी ३०.

मध्य महाराष्ट्र : गगनबावडा, महाबळेश्वर, शाहूवाडी, राधानगरी प्रत्येकी ३०, लोणावळा, चंदगड प्रत्येकी २०.

‎सोमवारी (ता. २) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---२९.५---२१.५

‎‎धुळे---३९.०---२०.०

जळगाव---३८.२---२५.२

‎‎कोल्हापूर---३०.०---२२.२

‎महाबळेश्वर---२०.१---१७.६

मालेगाव---३६.८---२२.०

नाशिक---३१.५---२१.५

‎निफाड---३०.०---२०.२

‎सांगली---३१.५---२१.४

‎सातारा---२९.७---२२.४

‎सोलापूर---३४.६---२३.६

‎सांताक्रूझ---३३.३---२५.५

डहाणू---३४.९---२६.७

‎रत्नागिरी---३२.०---२४.१

‎छत्रपती संभाजीनगर---३३.६---२२.६

‎धाराशिव---३३.३---२२.०

‎परभणी---३५.०---२३.४

परभणी (कृषी)---३५.५---२१.७

‎अकोला---३७.६---२६.९

अमरावती---३६.२---२५.४

‎‎‎बुलडाणा---३८.४---२७.०

‎ब्रह्मपुरी---३९.४---२६.४

‎चंद्रपूर---३९.८---२६.४

‎गडचिरोली---३८.२---२५.४

‎गोंदिया---३८.२---२७.०

‎नागपूर---३८.२---२७.०

‎वर्धा---३७.४---२७.८

‎वाशीम---३५.२---निरंक

‎यवतमाळ---३७.२---२५.८

जोरदार पावसाची शक्यता ( येलो अलर्ट) :

सिंधुदूर्ग.

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nandini River Conservation: नंदिनी नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी राबले हात

Social Awareness: सुशिक्षित समाजातील अंधश्रद्धा अधिक धोकादायक : माजी खासदार कुमार केतकर

Ahilyanagar MLAs: अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा

Agriculture Awareness Campaign: संतुलित खत वापरासाठी कृषी विज्ञान केंद्राची जनजागृती मोहीम

Farm Loan Waiver Controversy: अटी, शर्तींचे जाळे टाकून शेतकऱ्यांची फसवणूक; कर्जमाफीवर विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT