Rain Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain : आज आणि उद्या पावसाची शक्यता; राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणाचा अंदाज

Weather Update : ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली असून दुपारी उन्हाचा चटका काहीसा जाणवत आहे. पण हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या काही भागात हलक्या सरी पडत आहेत. ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली असून दुपारी उन्हाचा चटका काहीसा जाणवत आहे. पण हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला.

हवामान विभागाने आज आणि उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवड्यातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे.  हवामान विभागाने आज धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील काही भागात विजा, ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावासचा येलो अलर्ट दिला.

तर या भागात ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज दिला आहे. तसेच पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

तसेच उद्या म्हणजेच मंगळवारी धुळे, जळगाव, नाशिक आणि नगर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा, ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला. तर या भागात ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

तर ठाणे, पालघर, रायगड, नंदूरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT