Rainy Weather Agrowon
हवामान

Rain News : राज्यात आजही पावसाची शक्यता; उष्णतेचा पारा वाढला

Weather Update : आज हवामानशास्त्र विभागाने राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे.

Dhananjay Sanap

Weather Update : राज्यात वाढत्या उष्णतेसोबतच पावसानंही तडाखा द्यायला सुरुवात केलीय. आज हवामानशास्त्र विभागाने राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे.

तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी रात्रीच्या तापमान वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

आज राज्यातील धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशीव, चंद्रपुर, गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलाय.

मागील दोन आठवड्यांपासून राज्यात अवकाळी पावसानं शेती पिकांचं नुकसान केलंय. राज्यात कमाल तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सियसच्या पार पोचलेलाय. तर मागील चोवीस तासात मालेगाव, अकोला, जळगाव, चंद्रपुर, धुळे जिल्ह्यात तापमान ४३ अंश सेल्सियसच्या वर पोहचला.

राज्यात ढगाळ हवामानसोबतच उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT