Rain Agrowon
हवामान

Rain Forecast : राज्यात पावसाची उघडीप शक्य

अमोल कुटे

Pune News : मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरला आहे. उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण वगळता उर्वरित भागात पावसाने उघडीप देणार आहे. आज (ता.२९) राज्यात मुख्यतः पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे. आग्नेय अरबी समुद्रापासून वायव्य बिहारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पावसाळी वातावरण, ढगाळ हवामानामुळे निवळताच कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. शनिवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ३२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. २९) राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील वाशीम, नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

मॉन्सून परतीची वाटचाल ‘जैसे थे’

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. २३) वायव्य राजस्थान आणि कच्छमधून परतीचा प्रवास सुरू केला. मंगळवारी (ता. २४) राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागासह पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून मॉन्सून परतला. त्यानंतर मात्र मॉन्सून परतीची वाटचाल जैसे थे असून, फिरोजपूर, सिरसा, चुरू, अजमेर, माऊंट आबू, दिसा, सुरेंद्रनगर ते जुनागडपर्यंत मॉन्सूनची परतीची सीमा कायम आहे.

विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : वाशीम, नागपूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert : घाटमाथ्यावर जोरदार पाऊस

Seed Industry : बियाणे उद्योगावरील जाचक नियंत्रणे हटवा

Agriculture Department : ‘लाडक्या कंत्राटदारा’मुळे कृषी पुरस्कार्थी जेरीस

Bamboo Planting Workshop : पौडमध्ये बांबू लागवड कार्यशाळा

B.B. Thombare : बी. बी. ठोंबरे साखर उद्योगासाठी मार्गदर्शक : राज्यपाल बागडे

SCROLL FOR NEXT