Rain Update  Agrowon
हवामान

Weather Update : दक्षिण महाराष्ट्रात उद्यापासून पावसाची शक्यता

Rain Forecast : भारताच्या दक्षिणेकडील कोमोरीन भागापासून आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्याच्या तापमानात चढ-उतार होत असल्याने थंडी कमी झाली आहे. यातच पावसला पोषक हवामान होत असून, उद्यापासून (ता. २३) महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात जोरदार वारे, विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. आज (ता. २२) राज्यात ढगाळ हवामानासह किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

भारताच्या दक्षिणेकडील कोमोरीन भागापासून आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. कोमोरिन भागावर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती तसेच तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती वरील कमी दाबाच्या पट्ट्यात विरून गेली आहे.

यातच राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. गुरूवारी (ता. २३) सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची, तर सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये डहाणू येथे देशातील उच्चांकी ३६.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सांताक्रुझ येथे कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांच्या पार आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान ३१ ते ३५ अंशाच्या दरम्यान आहे.

किमान तापमानातही चढ-उतार सुरूच असून, गारठा कमी झाला आहे. मंगळवारी (ता. २१) जळगाव येथे राज्यातील नीचांकी १४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे.

मंगळवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.५ (१७.४), जळगाव ३२.५(१४.९), कोल्हापूर ३०.५ (१९.८), महाबळेश्वर २६.१ (१५.९), नाशिक ३१.७ (१६.८), निफाड ३०.८ (१५.४), सांगली ३१.० (१८.८), सातारा ३१.६ (१८.०), सोलापूर ३४.०(१८.४), सांताक्रूझ ३६.५(२४.२), डहाणू ३६.६ (२२.६), रत्नागिरी ३५.० (२२.४),

छत्रपती संभाजीनगर ३१.६ (१७.२), नांदेड ३१.० (१६.६), परभणी ३१.५ (१७.०), अकोला ३३.२ (१७.२), अमरावती ३२.४ (१८.३), बुलढाणा ३१.४ (१७.२), ब्रह्मपूरी ३३.८ (१८.३), चंद्रपूर ३१.६(१८.५), गडचिरोली ३१.० (१५.४), गोंदिया ३१.० (१६.०), नागपूर ३१.७(१६.३), वर्धा ३१.८(१७.४), वाशीम ३३.८(१७.०), यवतमाळ ३३.० (१५.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT