Summer Heat Agrowon
हवामान

Vidarbha Heatwave: मराठवाडा-विदर्भात पावसाची शक्यता; विदर्भात उन्हाचा चटका तर अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद

Rain Prediction: राज्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून विदर्भात तापमानाने उच्चांक गाठला आहे. अकोला ४४.२ अंश सेल्सिअसवर तापले असतानाच काही जिल्ह्यांत पावसाच्या सरींचाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील काही भागात पावसाला पोषक स्थिती कायम आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. विदर्भात उन्हाचा चटका चांगलाच वाढला. अकोला येथे राज्यातील सर्वाधिक ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

हवामान विभागाने  कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सांगली तसेच बीड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. चंद्रपूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला. तर जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, नंदूरबार, धुळे, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे.

सोलापूर, परभणी जिल्ह्यात उद्या तर लातूर जिल्ह्यात बुधवारी आणि गुरुवारी, धाराशिव जिल्ह्यात बुधवारी आणि गुरुवारी, अमरावती जिल्ह्यात शुक्रवारी, चंद्रपूर जिल्ह्यात गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी पावसाचा अंदाज आहे. तर गडचिरोली, भंडारा, गोंदीया जिल्ह्यात शनिवारी तसेच नागपूर, वर्धा जिल्ह्यात शुक्रवारी तर वाशीम जिल्ह्यात गुरुवारी आणि यवतमाळ जिल्ह्यात गुरुवार आणि शुक्रवारी काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

तर दुसरीकडे दोन दिवसात विदर्भात उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता. अकोला येथे राज्यातील सर्वाधिक ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. ब्रम्हपुरी येथे ४३.८ अंश, चंद्रपूर आणि अमरावतीत ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यातही ४२ अंशापेक्षा अधिक तापमान होते. राज्यातील इतर भागातही तापमान ४१ अंशाच्या दरम्यान पोचले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT