Weather  Agrowon
हवामान

Weather Update: विदर्भातील पाच जिल्ह्यात पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Weather Forecast : आज विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं दिली आहे.

Dhananjay Sanap

Weather Update : राज्यात आज ढगाळ वातावरणामुळे सकाळी गारवा पसरला. तर दुपारी उकाड्यासोबत उन्हाचा चटकाही जाणतोय. आज विदर्भातील पाच जिल्ह्यात हवामान विभागानं तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिलाय. 

शुक्रवारी विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरीनं हजेरी लावली. तर आज विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं दिली आहे.

तर मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड तसेच जळगाव आणि अहमदनगरमध्ये ढगाळ हवामान राहील. उर्वरित राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

सध्या रब्बीतील पीक काढणी सुरू आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. उत्तर भारतात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे.

त्यामुळं जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशमध्ये १८ ते २० फेब्रुवारी तर उत्तराखंडमध्ये १९ ते २० फेब्रुवारी रोजी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT