Winter Season Agrowon
हवामान

Maharashtra Cold Wave : राज्यात गारठा काहीसा वाढण्याची शक्यता

Winter Weather Forecast : आज (ता. १९) राज्यात आकाश मुख्यतः निरभ्र राहून, पुढील दोन दिवस किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात होत असलेल्या अंशतः ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. मात्र दोन दिवस गारठा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. १९) राज्यात आकाश मुख्यतः निरभ्र राहून, पुढील दोन दिवस किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुजरातपासून राजस्थानपर्यंत तसेच नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. वायव्य भारतात १३० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत. पश्चिमी चक्रावातांच्या तीव्रतेनुसार थंडी कमी-अधिक होत आहे. शनिवारी (ता. १८) उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्याच्या अनेक भागांत धुक्याची दुलई पाहायला मिळत आहे. ढगाळ हवामान निवळताच गारठा थोडासा वाढला आहे. किमान तापमानाचा पारा पुन्हा १५ अंशांच्या खाली येऊ लागला आहे. दिवसभर वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे उन्हाचा चटका कमी होत आहे. शनिवारी (ता. १८) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

शनिवारी (ता. १८) सकाळपर्यंच्या २४ तासांत सांताक्रूझ येथे ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १९) राज्यात मुख्यतः निरभ्र आकाश राहण्याचा तसेच अंतर्गत महाराष्ट्रात किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी (ता. १८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---२९.६---१३.१

अहिल्यानगर---३०.८---१२.५

धुळे---२७.०---९.६

जळगाव---२८.५---१३.५

जेऊर---३०.५---१३.५

कोल्हापूर---२९.६---१८.६

महाबळेश्वर---२३.८---१३.४

मालेगाव---२६.२---१५.२

नाशिक---२८.३---१४.६

निफाड---२८.५---११.९

सांगली---३१.२---१९.६

सातारा---३०.७---१६.३

सोलापूर---३२.०---१६.९

सांताक्रूझ---३५.५---१८.७

डहाणू---२८.६---१८.९

रत्नागिरी---३५.४---२२.२

छत्रपती संभाजीनगर---२९.७---१४.०

धाराशिव---२८.८---१७.६

परभणी---२९.७---१३.४

परभणी (कृषी)---२९.४---१०.२

अकोला---३०.६---१४.८

अमरावती---३१.२---१५.३

भंडारा---२७.४---१४.४

बुलडाणा---३०.०---१४.८

ब्रह्मपुरी---३२.०---१३.९

चंद्रपूर---३०.२---निरंक

गडचिरोली---२९.०---१४.०

गोंदिया---२८.०---१४.४

नागपूर---२९.३---१४.०

वर्धा---२९.८---१४.६

वाशीम---२९.६---निरंक

यवतमाळ---२८.७---१५.०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT