Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : तापमानाचा पारा दहा अंशांवर

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या अभावामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. पारा १० अंशांच्या वर सरकल्याने राज्यात गारठा कमी झाला आहे. आज (ता. ५) राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहणार आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा १४ ते २४ अंशादरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी-अधिक होत आहे. रविवारी (ता. ४) बिहारमधील गया येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ७.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, सिक्कीम, पश्चिम बंगालमध्ये किमान तापमान ९ ते १२ अंशांदरम्यान आहे. हिमाचल प्रदेश, उत्तरखंड येथे हिमवृष्टी होण्याची आणि उत्तर भारतातील राज्यांत दाट धुके पडण्याची शक्यता आहे.

रविवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.३ (१४.१), धुळे ३१.५ (१०.३), जळगाव - (१३.९), कोल्हापूर ३२.२ (१९.५), महाबळेश्वर २७.३ (१६.४), मालेगाव ३२.० (१६.०), नाशिक ३१.८ (१४.४), निफाड ३०.६ (१०.८), सांगली ३३.५ (१८.५), सातारा - (१६.४), सोलापूर ३५.२(२१.४), सांताक्रूझ ३६.२ (२०.१), डहाणू ३४.७ (१९.४), रत्नागिरी ३५.६ (२०.५),

छत्रपती संभाजीनगर ३१.० (१५.५), नांदेड - (१७.८), परभणी ३१.३ (१६.०), अकोला ३२.६ (१५.६), अमरावती ३१.४ (१५.६), बुलडाणा ३१.४ (१६.०), ब्रह्मपुरी ३३.४ (१५.७), चंद्रपूर ३१.० (१४.४), गडचिरोली ३०.२ (१५.३), गोंदिया २९.५ (१३.६), नागपूर ३०.२(१५.३), वर्धा ३१.०(१५.६), वाशीम ३१.६ (१५.४), यवतमाळ ३३.० (१४.५).

थंडी झाली कमी

राज्याच्या तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झाला आहे. निफाड, धुळ्यासह किमान तापमानाचा पारा १० अंशाच्या पुढे गेला असून, किमान तापमान १० ते २२ अंशांच्या दरम्यान स्थिरावले आहे. आज (ता. ५) किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT